गजल गुलाम अलींची
गुलाम अली यांची गजल ऐकणे म्हणजे एक तृप्त करणारा अनुभव असतो.त्यातील शब्दांना उठाव देणाऱ्या सुरावटी व त्यांची गायकी. म्हणजे जर शब्द समजले नाहीत तर गायकी सुद्धा तृप्तीचा अनुभव देते. मला आठवतंय त्या नुसार ते १९८२ मध्ये भारतात आले होते आणि त्याच्या गजलांनी त्यांनी वातावरण पूर्ण भरून टाकले होते. सुप्रसिद्ध गजल गायिका प्रा. साशिकला शिरगोपीकर, राजीव परांजपे व काही संगीत प्रेमी आमच्या घरी जमले होते . एक छान अनौपचारिक मैफल जमली होती तेव्हा गुलाम अली यांचा विषय निघाला. त्यांच्या गायकीच्या अनेक अंगांवर बोलणे झाले. म्हणजे समेवर येताना बर्याच वेळा ते चमत्कृती करून समेवर येतात तेव्हा मात्रांचा हिशेब चुकतो का वगैरे. पण तेव्हापासून मी त्यांचा चाहता झालो. अनेक वेळा ध्वनिमुद्रिका ऐकल्या. अर्थात यात विशेष असे काही नाही. त्यांचे करोडो चाहते असेच करतात. आणि एका वसंतोत्सवात त्यांना प्रत्यक्ष ऐकायची संधी पण मिळाली .या पेक्षा भाग्य वेगळे ते काय असते. त्यांच्या बर्याच गजल समजायला सोप्या असतात . चुपके चुपके आणि हंगामा म्हणजे त्यांचे मास्टर पीस. पण मला विशेष भावते ती
कल चौदहवीं की रात थी शब भर रहा चर्चा तेरा।
कुछ ने कहा ये चाँद है कुछ ने कहा चेहरा तेरा।
हम भी वहीं मौजूद थे, हम से भी सब पूछा किए,
हम हँस दिए, हम चुप रहे, मंज़ूर था परदा तेरा।
इस शहर में किस से मिलें हम से तो छूटी महिफ़लें,
हर शख़्स तेरा नाम ले, हर शख़्स दीवाना तेरा।
कूचे को तेरे छोड़ कर जोगी ही बन जाएँ मगर,
जंगल तेरे, पर्वत तेरे, बस्ती तेरी, सहरा तेरा।
तू बेवफ़ा तू मेहरबाँ हम और तुझ से बद-गुमाँ,
हम ने तो पूछा था ज़रा ये वक्त क्यूँ ठहरा तेरा।
हम पर ये सख़्ती की नज़र हम हैं फ़क़ीर-ए-रहगुज़र,
रस्ता कभी रोका तेरा दामन कभी थामा तेरा।
दो अश्क जाने किस लिए, पलकों पे आ कर टिक गए,
अल्ताफ़ की बारिश तेरी अक्राम का दरिया तेरा।
यातील तरल प्रेमभाव मन लुभावून जातो.
तशीच एक गुलाम अलींची गजल ऐकली. त्यातील शायरी डोक्यातून जातच नव्हती मग तिला मराठी पेहराव करुन पेश करण्याचा हा छोटा प्रयत्न.
माझ्या दिठीत विसाव काही काळ
नंतर स्वप्नात राहिलीस तरी काय
काही रंग भर माझ्या आयुष्यात
नंतर जखमा भळभळणारच आहेत
एक आरसा होता तो फुटला
आता त्यात पाहून स्वत:शी लाजणे कशाला
मी विरहात होतो विरहीच आहे
तू आलीस काय न गेलीस काय
जर मीच बहरलो नाही
तर तुझ्या वचनांचे काय
जर कुणी पाहणारेच नसेल
तर जळलो काय वा विझलो काय
थोडे अनुवाद स्वातंत्र्य घेतले आहे
अनिल जोशी
१६.०३.२०२०
कृपया आपले मत आपल्या नावासह मांडावे .
Chhan agdi khare ahe
ReplyDeleteछान. मस्त👍
ReplyDelete