मन पाखरू पाखरू
प्रत्येक माणसाला मन असते आणि म्हणूनच कदाचित माणूस या शब्दाला मानव असा प्रतिशब्द आहे. आणि मानव या शब्दाशी मन हे जवळचे आहे .म्हणजे ज्याला मन आहे तो मानव . आणि विशेष म्हणजे हे मन कुणाला दाखवता वा पाहता येत नाही. म्हणजे त्याचे अस्तित्व तर जाणवते पण दिसत नाही. आपले मन आपल्या सार्या कृती नियंत्रित करते आणि ते कुठे कसे भरकटेल हे कुणालाच सांगता येत नाही. सगळे संत सुद्धा मनाला शरण गेलेले दिसतात. रामदास स्वामी तर आपला सगळा उपदेश हा मनालाच मनाच्या श्लोकातून केला आहे.
पण मनाचे हे असे अवघड स्वरूप अध्यात्मात ठीक आहे. पण आपण आपले जीवन असे अवघड करून नाही जगू शकत. कधी कधी मन आपल्याला काही वेगळेच सांगते पण बर्याच वेळा आपण मनाचे ऐकतो आणि आनंद घेतो. आणि ज्या व्यक्ती अशा जगतात त्यांना मनमौजी म्हणतात. काही वेळा आपल्याला मनाविरुद्ध वागावे लागते तेव्हा आपण त्याला मन मारणे असे म्हणतो. आपले शरीर हे जड आहे तर मन हे अतिसूक्ष्म असल्याने त्याच्या संचारावर कोणतेच नियंत्रण नाही . त्यामुळे आपण मानाने कुठे ही भ्रमण करत असतो . आपण पणाला फुल पाख्रासारखे वागवतो व म्हणतो माझे मन तुझ्यावर बसले आहे/ जडले आहे.
कुणी एखाद्या समारंभाचे निमंत्रण दिले व आपल्याला जायला जमत नसेल तर तो नकार आपण -आम्ही शरीराने नसलो तरी मानाने तिकडेच असू - अशा शब्दात देतो. मन हे अतिसूक्ष्म असले तरी ते सागरासारखे अथांग असते की त्याचा थांग अजिबात लागत नाही. समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे समजण्याचे तंत्र अजून विकसित झाले नाही. काही आडाखे, काही ठोकताळे यामुळे कधी कधी थोडाफार अंदाज येवू शकतो पण हे अपवादात्मकच. त्यामुळे शरीराप्रमाणे मानल काही आजार झाला असेल तर मानसोपचार तज्ञाला पण जर त्या व्यक्तीने सहकार्य नाही केले तर काही करता येत नाही .याचे एक महत्वाचे कारण म्हणजे आपल्या मनाला काही आजार झाला असेल हेच आपले मन मान्य करत नाही. इथे मनाचे नाठाळ पण\ जाणवते व मन हट्टी आहे हे पण अधोरेखित होते.
कलासागर दिवाळी अंकाच्या प्रकाशनाल डॉ.श्रीराम लागु आले होये तेव्हा त्यांनी एक विचार मांडला होता. ते म्हणाले होते.माणसाचा मेंदू आणि माकडाचा मेंदू हे सारखेच असता पण माणसाचा १/९ मेंदू हा माकडाच्या मेंदू पेक्षा वेगळा असतो आणि त्यामुळे माणसात बुद्धी आणि मन असते. आणि या मनाची मशागत करायची तर साहित्य, संगीत, कला यांची साधना करावी लागते.
माझिया मना जरा थांब ना
माझिया मना जरा थांब ना
माझिया मना जरा थांब ना
माझिया मना जरा थांब ना
माझिया मना जरा थांब ना
पाउली तुझ्या, माझिया खुणा
पाउली तुझ्या, माझिया खुणा
तुझे धावणे अन मला वेदना
माझिया मना जरा थांब ना
माझिया मना जरा थांब ना
पाउली तुझ्या, माझिया खुणा
तुझे धावणे अन मला वेदना
माझिया मना जरा थांब ना
माझिया मना जरा थांब ना
माझिया मना जरा बोल ना
माझिया मना जरा बोल ना
ओळखू कसे मी हे तुझे ऋतू?
ओळखू कसे मी हे तुझे ऋतू?
माझिया मना जरा बोल ना
ओळखू कसे मी हे तुझे ऋतू?
ओळखू कसे मी हे तुझे ऋतू?
माझिया मना...
माझिया मना...
माझिया मना जरा बोल ना
ओळखू कसे मी हे तुझे ऋतू?
माझिया मना...
माझिया मना जरा बोल ना
ओळखू कसे मी हे तुझे ऋतू?
एकटी न मी सोबतीस तू
एकटी न मी सोबतीस तू
ओळखू कशा मी तुझ्या भावना?
माझिया मना जरा थांब ना
माझिया मना...
एकटी न मी सोबतीस तू
ओळखू कशा मी तुझ्या भावना?
माझिया मना जरा थांब ना
माझिया मना...
माझिया मना जरा ऐकना
माझिया मना जरा ऐकना
सांजवेळ ही तुझे चालणे
सांजवेळ ही तुझे चालणे
माझिया मना जरा ऐकना
सांजवेळ ही तुझे चालणे
सांजवेळ ही तुझे चालणे
माझिया मना जरा ऐकना
सांजवेळ ही तुझे चालणे
रात्र ही सुनी तुझे बोलणे
रात्र ही सुनी तुझे बोलणे
उषःकाल आहे नवी कल्पना
माझिया मना जरा थांब ना
माझिया मना जरा थांब ना
सांजवेळ ही तुझे चालणे
रात्र ही सुनी तुझे बोलणे
रात्र ही सुनी तुझे बोलणे
उषःकाल आहे नवी कल्पना
माझिया मना जरा थांब ना
माझिया मना जरा थांब ना
पाउली तुझ्या, माझिया खुणा
पाउली तुझ्या, माझिया खुणा
तुझे धावणे अन मला वेदना
माझिया मना जरा थांब ना
माझिया मना जरा थांब ना
पाउली तुझ्या, माझिया खुणा
तुझे धावणे अन मला वेदना
माझिया मना जरा थांब ना
माझिया मना जरा थांब ना
अनिल जोशी
१७.०३.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी
Comments
Post a Comment