पाडगावकर भेटतात तेव्हा

मंगेश पाडगावकर हे मराठी कवितेतील मोठे नाव. तरल पण सध्या सोप्या रचना हे त्याचे खास वैशिष्ट्य. त्यांच्या कविता इतक्या सुंदर व गेय होत्या की अनेक संगीतकारांना त्यांची गाणी बनवायचा मोह झाला आणि अनेक सुंदर गाण्यांची निर्मिती झाली. श्रीनिवास खळे , यशवंत देव ही काही प्रमुख नावे. पण पु ल देशपांडे यांनी माझे जीवन गाणे व शब्दांवाचून कळले सारे ही गाणी जितेंद्र अभिषेकी यांच्याकडून गावून घेतली. त्यांचे कविता संग्रह तर इतके आहेत की हा माणूस सतत कविता जगत असावा असे वाटते.
प्रकाशित साहित्य
धारानृत्य (कवितासंग्रह)
जिप्सी (कवितासंग्रह)
छोरी (कवितासंग्रह)
शर्मिष्ठा (कवितासंग्रह)
उत्सव (कवितासंग्रह)
वात्रटिका (कवितासंग्रह)
भोलानाथ (कवितासंग्रह)
मीरा (कवितासंग्रह) (मीराबाईंच्या भजनांचा अनुवाद)
सलाम (कवितासंग्रह)
गझल (कवितासंग्रह)
भटके पक्षी (कवितासंग्रह)
तुझे गीत गाण्यासाठी (कवितासंग्रह)
बोलगाणी (कवितासंग्रह)
चांदोमामा (कवितासंग्रह)
सुट्टी एक्के सुट्टी (कवितासंग्रह)
वेड कोकरू (कवितासंग्रह)
उदासबोध (कवितासंग्रह)
त्रिवेणी (कवितासंग्रह)
कबीर (कवितासंग्रह) (कबीराच्या दोह्यांचा अनुवाद)
मोरू (कवितासंग्रह)
सूरदास (कवितासंग्रह)
कविता माणसाच्या माणसासाठी (कवितासंग्रह)
राधा (कवितासंग्रह)
आनंदऋतू (कवितासंग्रह)
सूर आनंदघन (कवितासंग्रह)
मुखवटे (कवितासंग्रह)
काव्यदर्शन (कवितासंग्रह)
तृणपर्णे (कवितासंग्रह)
गिरकी (कवितासंग्रह)
वादळ (नाटक)
ज्युलिअस सीझर (नाटक)
धारानृत्य (कवितासंग्रह)
जिप्सी (कवितासंग्रह)
छोरी (कवितासंग्रह)
शर्मिष्ठा (कवितासंग्रह)
उत्सव (कवितासंग्रह)
वात्रटिका (कवितासंग्रह)
भोलानाथ (कवितासंग्रह)
मीरा (कवितासंग्रह) (मीराबाईंच्या भजनांचा अनुवाद)
सलाम (कवितासंग्रह)
गझल (कवितासंग्रह)
भटके पक्षी (कवितासंग्रह)
तुझे गीत गाण्यासाठी (कवितासंग्रह)
बोलगाणी (कवितासंग्रह)
चांदोमामा (कवितासंग्रह)
सुट्टी एक्के सुट्टी (कवितासंग्रह)
वेड कोकरू (कवितासंग्रह)
उदासबोध (कवितासंग्रह)
त्रिवेणी (कवितासंग्रह)
कबीर (कवितासंग्रह) (कबीराच्या दोह्यांचा अनुवाद)
मोरू (कवितासंग्रह)
सूरदास (कवितासंग्रह)
कविता माणसाच्या माणसासाठी (कवितासंग्रह)
राधा (कवितासंग्रह)
आनंदऋतू (कवितासंग्रह)
सूर आनंदघन (कवितासंग्रह)
मुखवटे (कवितासंग्रह)
काव्यदर्शन (कवितासंग्रह)
तृणपर्णे (कवितासंग्रह)
गिरकी (कवितासंग्रह)
वादळ (नाटक)
ज्युलिअस सीझर (नाटक)
ही माहिती फक्त उत्कंठा म्हणून. त्यांना कधी भेटता येईल असे स्वप्नात पण वाटले नव्हते. पण तो योग आला. त्यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम कलासागर तर्फे ठेवला होता. आणि ते कुठेतरी असे म्हणाले होते की परगावी लोक बोलावतात , व्यवस्था पण ठेवतात पण कार्याक्रमा पुरतीच त्यांची दाखल घेतली जाते आणि बाकी वेळ फार कंटाळवाणा जातो. हेच सूत्र पकडून ते संध्याकाळी ज्या हॉटेल वर येणार होते तिथे आम्ही ४-५ जण जावून धडकलो व त्यांना सांगितले आम्ही तुमच्याशी फक्त गप्पा मारायला आलो आहोत , अर्थात तुमची इच्छा असेल तर. त्यांनी मनापासून स्वागत केले आणि मग अनेक विषयांवर खूप गप्पा झाल्या . ते खूप मोकळे झाले होते. आणि जेवण झाल्या नंतर मध्यरात्री आम्ही त्यांचा निरोप घेवून घरी परत आलो. दुसर्या दिवशी ते कंपनीत येवून कंपनी पाहून गेले. संध्याकाळी मग कार्यक्रम झाला त्यात त्यांनी प्रामुख्याने बोल गाणी सादर केली . ते गेल्याचे समजले तेव्ह्या आम्हाला त्यांच्याबरोबर व्यतीत केलेली संध्याकाळ आठवली जी आम्ही कधीच विसरू शकणार नाही.
काही बोलगाणी त्यांची आठवण म्हणून.
अनिल जोशी
१९.०३.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी


Comments
Post a Comment