बेंड ची गाणी
हा तसा पूर्वीचा काळ आहे. आता सारखे संगीत पटकन उपलब्ध होत नसे. त्यावेळी एक लोकप्रिय संगीत प्रकार होता तो म्हणजे बेंड. आता हे बेंड पथक हे गणवेशात असते त्यामुळे जर कुणी सारखे कपडे घातले की त्यांना बेंडवाले म्हणतात. कोणत्याही मिरवणुकीत हे पथक मनोभावे संगीत सादर करतात. त्याच प्रमाणे विवाह मुंज अशा मंगल कार्यात बेंड बोलावणे प्रतिष्ठेचे मानले जात असे. आजही सकाळी अप्पा बळवंत चौकातून जाताना या पथकाची तालीम चाललेली ऐकायला मिळते. पण हल्ली सर्रास कार्यांना बेंड बोलावणे आढळत नाही. जेवणावळीत ध्वनिमुद्रित संगीत लावतात ते पण क्वचित. अन्यथा भेटीगाठी आणि गप्पा एवढच होत.

मला आठवतंय लहानपणी चुलत बहिणीच्या लग्नाला हैदराबाद येथे गेलो होतो. लगीन सराईचे दिवस. सगळीकडे खूप लागणे होत होती. आणि प्रत्येक लग्नात बेंड असयचाच . त्यावेळी सुरज या चित्रपटातील बहारो फुल बरसावो हे गाण आवर्जून वाजवले जायचे आणि ते ऐकायला खूप आवडायचे. तेव्हा लक्षात आलं की एखाद्या गाण्याची लोकप्रियता ते बेंडवर किती वाजत यावर ठरते.
पुढे मग मिलन मधील सावन का महिना पवन कारे सोर हे गाणे असेच फेमस झाले होते. त्यानंतर आठवतंय ते सायोनारा सायोनारा हे गाणे पण सारखे वाजायचे. तर सरस्वती चंद्र मधील चंदनसा बदन आणि मै तो भूल चली बाबुल का देस ही गाणी अशीच सारखी वाजायची.
पुढे जसे बालपण संपले तसे गाणी नीट ऐकणे थांबले. बेंडवाले यायचे आणि वाजवून निघून जायचे. फार काही लक्षात यायचे नाही. माझ्या मुलाच्या मुंजीत हौसेने बोलावला होता पण त्यांनी काय वाजवले हे काही सांगता येणार नाही.
असे असले तरी बेंडची मजा काही औरच होती. त्याच्या बरोबर लाउड स्पीकर बर गाणी पण तितकीच फेमस असायची. लोकप्रिय गाण्यांची रेलचेल. जत्रा, उत्सव हे याशिवाय साजरे होताच नसत. काही वेळा गाणी प्रसंगानुरूप वाजत .म्हणजे गणपतीत गणपतीची गाणी, नवरात्रात देवीची गाणी, शिव जयंतीला पोवाडे, स्वातंत्र्य दिनी देशभक्तीपर गीते वगैरे. पण इथे वाजणार ती गाणी पॉप्युलर असणारच .
आता ती जागा डीजे ने घेतली. आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ ह्या गाण्याने बहुतेक लोकप्रियतेचे सगळे उच्चांक मोडले. त्याच प्रमाणे माझा नवीन पोपट हा, कोंबडी पळाली अशीच सर्वदूर पसरलेली गाणी.
आजही बेंड काय, डीजे काय संगीताच्या प्रसाराला याशिवाय पर्याय नाही.
अनिल जोशी
०२.०३.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावानिशी द्यावी.

Comments
Post a Comment