संगीत आणि त्याचे तंत्र

Image result for images of microphoneImage result for images of microphone

आपल्याया अमिताभ आणि ज्या यांचा अभिमान हा चित्रपट आठवत असेल अमिताभ हा एक प्रसिद्ध गायक आपल्या गावी आला आहे आणि फिरायला गेला असता जशी वार्याची झुळूक यावी तसे त्याच्या कानावर स्वर येतात -नदिया मिणारे नदिया किनारे हैराई.....

आपल्याला मात्र असं होत नाही. आपण रेडिओवर वा अन्य साधनांवर गाणी ऐकतो. पूर्वी देवळातून कीर्तने , किंवा काही काळ ध्वनिक्षेपकाशिवाय नाटके होत असत . म्हणून लोक बालगंधर्व यांना मानतात करत त्यांचे गाणे सुरुवातीच्या रांगांमध्ये शेवटच्या रांगांत पण सारखेच ऐकू यायचे . पण ध्वनिवर्धक आले आणि संगीतात तंत्र आले. गाणार्याला माईक चे भान ठेवावे लागते. तो आवाज त्या माईक मधून वाढताना थोडा बदलतो पण. आणि काही आवाज माईक ला सूट पण होत नाही. शिवाय माईक वर बोलायला सुरुवात केली की कुई असा एक कर्कश्श आवाज अपरिहार्यपणे यायचा.पूर्वी एक माईक वर मधोमध टांगलेला असे आणि त्यात संवाद, गाणी, साथीचे संगीत मिसळून ऐकू यायचे. त्या नंतर अनेक माईक वापरायची पद्धत सुरु झाली आणि हे वेवेगळ्या माईक मधील आवाज श्रोत्यांना ऐकू यायच्या आधी एक प्रक्रिया होत असे आणि ती म्हणजे मिक्सिंग. ही प्रक्रिया on line म्हणजे तिथल्या तिथे करावी लागते. आणि मग ध्वनी संयोजन महत्वाचे ठरू लागले. या तंत्राच्या विकासाची ही थोडक्यात माहिती.
याने संगीत ऐकण्यावर काय आणि कसा कसा परिणाम होत गेला ते पाहू. हा परिणाम म्हणजे स्वानुभव आहे. लहानपणी transistor घरी आला . तेव्हा रेडिओचे तंत्र फारसे विकसित झालेले नव्हते. त्याला वेगळी एरीअल लागायची. आणि खेड्या पाड्यात तर खर खर हा रेडिओच्या आवाजाचा स्थायीभाव असायचा. स्वच्ह असा रेडिओ कमी वेळा ऐकायला मिळायचा. दूर दर्शनच्या सुरुवातीच्या काळातील मुंग्या मुंग्या अनेकांना आठवत असतील. त्या सोबत ग्रामोफोन वर ध्वनिमुद्रिका ऐकायचो. प्रत्येल ध्वनिमुद्रिकेच्या एका बाजूला एक व दुसर्या बाजूला एक असे तीन तीन मिनिटांचे गाणे असायचे. ठराविक रेकॉर्ड ऐकून झाल्यानंतर पिन बदलायला लागायची व ग्रामोफोन सुरु राहण्यासाठी चावी मारायला लागायची. आणि करण्यासोर बसलेला कुत्रा हे त्या कंपनीचे H M V म्हणजे His Masters Voiice चे खास चित्र असायचे.
पुढे ग्रामोफोन अधिक विकसित झाले. ध्वनी मुद्रिका पण तीन प्रकारच्या आल्या. त्याला वेगळे स्पीकर आले. त्या मुळे आवाजाच्या दर्जात खूप सुधारणा झाली. पण खरी क्रांती झाली ती स्टिरीओ परिणाम आल्यावर. म्हणजे गाणे आणि वाद्ये वेगवेगळे आवाज समजू लागले. आणि गाण्याची मजा घेता येवू लागली. भल्या मोठ्या हॉल मध्ये छान म्युझिक सिस्टीम , दोन बाजूला दोन स्पीकर्स , आपोआप रेकॉर्ड बदलण्याची सुविधा, मग काय जमलीच छानशी मेहफिल.
पुढे रेकॉर्ड ची जागा कॅसेट ने घेतली. मग सीडी आल्या आणि आणखी अनेक. टीव्ही मध्ये व्हिडिओ मुळे दृश्य परिणाम पण साध्य झला. पूर्वी असा समज होता की जितका मोठा स्पीकर तितका आवाज भरीव .पण तो समज खोटा ठरला आणि अगदी छोटे स्पीकर सुद्धा छान आवाज देतात.
याची पुढची क्रांती म्हणजे आपल्या मोबाईल फोनवर चे संगीत. आपला प्रवास , ट्राफिक जाम मध्ये अडकणे सुरेल करते. आणि फोन मधून संगीत आपल्यापर्यंत पोचवणारे एक छोटे उपकरण म्हणजे इयर फोन. सिने संगीत असले की त्याचे ध्वनिमुद्रण हे तांत्रिक दृष्ट्या उत्तमच असते. पाश्चात्य संगीताचे ध्वनिमुद्रण पण उच्च दर्जाचे असते की इयरफोन लावूनच त्याचा आस्वाद घटा येतो. पण आता शास्त्रीय संगीत पण तसेच उच्च दर्जाचे ऐकायला मिळते. आपण एखाद्या कार्यक्रमाला गेलो की तो सुरु होण्या आधी कलाकार ध्वनी संयोजकाला अनेक सूचना देत असतात. तबला कम करो, तानपुरा बढाओ , monitor देखो वगैरे. सुरुवातीला थोडा रसभंग झाल्यासारखे वाटते पण परिणाम चांगला मिळतो.
आज कुमारांचे गाणे ऐकत होतो.काय सुरेख रेकॉर्डिंग होते. छान गुंजा करणारा तानपुरा, मुलायम हर्मोनिम. आणि वसंत आचरेकर यांचा उत्कृष्ट ठेका देणारा तबला. तबला इतका स्वचछ ऐकू येत होता प्रत्येक बोल वेगळेपणाने त्याच्या वैशिष्ठ्याने वाजत होते. तिट , कीट, धिन धिग असे. डग्ग्यावरचे धुमारे , या सगळ्यामुळे तालाची छान लय निर्माण होते. आमचे सामंत गुरुजी सांगायचे की ताल मी शिकवेन पण त्याची लय स्वत:ला शोधावी लागेल. कारण ती उपजत असावी लागते.
फोनवर असे संगीत ऐकताना प्रत्यक्ष मैफलीचा आनंद मिळतो. असे म्हणतात की तंत्राचा अतिरेक कलेला मारक ठरतो पण कलाकाराने ते आत्मसात केले तर ते कलेला वेगळे परिमाण देते हे संगीताच्या बाबतीत तरी खरे ठरले आहे.

अनिल जोशी
२१०.०३.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी.

Comments

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती