कोणे एके संध्याकाळी
आज दुपारीच जोरकस पाऊस झाला आणि अजून पडतोच आहे . यामुळे आजची संध्याकाळ वेगळीच वाटली . ही संध्याकाळ पाहताना काही संध्याकाळी उलगडून गेल्या त्यांचा हा कोलाज नक्की आवडेल.
संध्याकाळ याने तिन्हीसांज म्हणजे दिवस आणि रात्र यांना अधोरेखित करणारी सीमारेषा. दिवस सरलेला आहे आणि रात्रीचा अजून अंदाज यायचा आहे आणि मनात विलक्षण हुरहूर दाटून येते. ही मनाची कातर अवस्था जर लक्षात आली तर समजावे आपल्या संवेदना अजून जागृत आहेत.
एखाद्या गावाबाहेरच्या संध्याकाळी
स्वत:चा श्वासोश्वास सुद्धा
स्पष्ट ऐकू येतो इतक्या शांततेत
स्वत:मध्ये हरवताना
पब्लिकने तुडुंब वाहणारे
रस्ते, दुकाने, आणि फुटपाथ
विविध मेक अप , फेंशन्स
अशा गर्दीत आपला ह्रिदम
हरवू नये म्हणून
तो शोधायची केलेली धडपड
किंवा एखादा रुक्ष दिवस विसरत
आजची संध्याकाळ सुद्धा गेली
ही जाणीव असह्य होत असताना
पालिकेच्या ट्यूब लाईट च्या प्रकाशात सुद्धा
आम्हाला वसंतात फुललेल्या गुलमोहराचा
लाल जर्द बहर कासावीस करतो
एखादी संध्याकाळ चोरपावलाने येते
अंधारून आलेल्या दिशा
मनाला स्वीकारता येत नाही
यासाठी प्रत्येल संध्याकाळ
ही नजरेखून घातलीच पाहिजे
उन्हाळ्याच्या तापलेल्या वातावरणात
सहज आलेली एखादी वळवाची सर
मृद्गंध जरी वातावरणात भरलेला असला
तरी कुणा तरुणीच्या
केसात माळलेल्या
टवटवीत मोगर्याचा गंध
धुंद करून जातो.
नदी काठी उभे राहिल्यावर
लांबच्या पुलावरून होणार्या
वाहतुकीचे भास
एक दोन रिकाम्याच डोलणाऱ्या होड्या
दिवसाचा सारा शीण नजरे वाटे
संथ पाण्यात सोडून द्यायचा.
अशी ही संध्याकाळची काही लोभस रूपे आठवताना
दोन मैत्रीणींची पण आठवण येते.
यमुना किनारी कातरवेळी
बासरीवर लुब्ध होणारी
प्रतीक्षा, विरह,हुरहूर,
बेभान ही राधिका की ठुमरी?
कुणी म्हणतात एक दुसरीची सावली .
पण ठुमरी राधिके पाठोपाठ येणारी
म्हणून सावली
ती इतकी गहिरी हृदय विरघळवणारी
खर तर दोघी वेगळ्या अस्तित्वाने उठून दिसणाऱ्या
एकरूप
म्हणून मैत्रिणी , जिवलग मैत्रिणी.
अनिल जोशी
१८.०३.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी.
Keval n keval apratim
ReplyDeleteNo words to express
This comment has been removed by the author.
ReplyDeleteसहज सुंदर ...अप्रतिम
ReplyDeleteधनश्री जोशी