भारतीय उद्योगांचे जनक -जमशेदजी टाटा
टाटा टेक्नॉलॉजीज् च्या हिंजवडी येथील मुख्य कार्यालयातील दर्शनी भागातील जमशेदजी टाटा यांचा पुतळा
आज जमशेदजी टाटा यांचा १८१वा जन्म दिन. भारत देशात उद्योग धंद्याची मुहूर्तमेढ करणारे हे पहिले उद्योग पती.त्यांचा जन्म १८३९ मध्ये पारंपरिक धर्मगुरूंची परंपरा असलेल्या गरीब कुटुंबात गुजरात मधील नवसारी येथे झाला.त्यांचे वडील नासेरवानजी हे कुटुंबातील पहिले व्यावसायिक ठरले. त्यांनी मुंबईत निर्यात व्यापार करणारी फर्म काढली. जमशेदजींना पाश्चिमात्य शिक्षण मिळाले. विल्सन महाविद्यलयातून त्यांनी पदवी घेतली व वडिलांच्या व्यवसायात त्यांना ते मदत करू लागले. त्या निमित्ताने त्यांनी अनेक देशात त्यांच्या शाखा काढून विस्तार केला. १८५७ मधील ब्रिटिश सरकार त्यांना उद्योग काढू देत नव्हते.त्यांच्या वडिलांनी त्यांना व्यवसायाची माहिती घेण्यासाठी वरचेवर चीन मध्ये पाठवले आणि तिथे फिरता फिरता त्यांच्या लक्षात आलं की सुती वस्त्रोद्योग आता भरभराटीस येणार आहे .१८६९ मध्ये त्यांनी एक चिंच पोकळी येथील बुडीत झालेली तेल कंपनी विकत घेतली त्या कंपनीचे रूपांतर त्यांनी सूत गिरणीत केले. तिचे नाव होते अलेक्झांडरा मिल. दोन वर्षात ती त्यांनी फायद्यात विकली. पुढे १८७४ मध्ये त्यांनी मध्य भारतात नागपूर येथे Spinning , Wiving व manufacturing करणारी मिल काढली. या निर्णयाबद्दल त्यांच्यावर टीका झाली कारण हा व्यवसाय मुंबईतच व्हावा अशी अन्य लोकांची इच्छा होती.
पण नागपूर येथे मुंबईच्या तुलनेत जागांचे भाव कमी होते आणि स्वस्त मजूर पुरवठा व कच्चा माल (कापूस) हे घटक पण महत्वाचे होते. इथे त्यांची दूर दृष्टी दिसते.हीच ती ऐतिहासिक एम्प्रेस मिल. १८७७ मध्ये इथे रेल्वे आली आणि नागपूर ची प्रगती व्हायला लागली. त्यांनी पॉण्डेचारी मध्ये आपल्या मालाच्या वितरणासाठी एक कंपनी काढली कारण तेव्हा पॉण्डेचारी ही फ्रेंच वसाहत होती. पोलाद उतपादन हे त्यांचे ध्येय होतेच पण त्यांनी गेटवे जवळ त्या काळात सुरु केलेले ताज महाल हॉटेल आजही दिमाखात उभे आहे.
टाटा स्टील ही आशिया मधील पोलाद उत्पादनातील अग्रणी कंपनी ठरली . बंगलोर येथे त्यांनी भारतीय विज्ञान संस्था स्थापन केली तर टाटा पॉवर नावाने विद्युत निर्मिती सुरु केली. ते स्वदेशीचे खंदे पुरस्कर्ते होते. पंडित नेहरू त्यांना एक सदस्यीय नियोजन मंडळ असे म्हणत. पुढे त्यांच्या वारसांनी टाटा हे मोठे उद्योग साम्राज्य उभे काळे ज्याचा पाया जमशेदजी यांनी घातला . विशेष म्हणजे आपला व्यवसाय हा
व्यावसायिकतेने पण विशिष्ट नीतिमत्तेने केला. उद्योगांतून मिळवलेला नफा त्यांनी उद्योगातच गुंतवला व आपण या उद्योगांचे विश्वस्त ही भूमिका घेतली. अनेक होतकरू तरुणांना संधी देऊन त्याच्यातून उद्योगाला पुढे नेणारे नेते तयार केले. समाज कार्यासाठी त्यांनी टाटा रिलीफ कमिटी तर्फे केलेली कामे इतरांसाठी मार्गदर्शक ठरली आहेत. रक्दानात पण त्यांनी भरीव कार्य केले आहे. कॅन्सर वर संशोधन करणारी संस्था व हॉस्पिटल पण टाटांचेच. आज अण्णा हजारे ज्या राळेगनशिंदी मधील कामाने नावारूपास आले तेथील अनेक विकास कामे टाटा रिलीफ कमिटी ने स्वतः: श्रेय न घेता केली आहेत.
या उद्योग समूहात आयुष्यातील ३९ वर्षे काम करायची संधी मिळणे हे परम भाग्य. या समूहाने आम्हाला आर्थिक पाठबळ तर दिलेच पण समाजात प्रतिष्ठा दिली आणि त्याही पलीकडे कुठेच मिळाले नसते असे शिक्षण दिले, कलागुणांना वाव दिला. अजून काय हवे?
आज देशातील अनेक अग्रणी उद्योगांच्या या संस्थापकाला शतश: प्रणाम.
अनिल जोशी
०३.०३.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी.

Comments
Post a Comment