अधिष्ठान तुझे
मी रोज लिहितो किंवा अनेक वर्षे लिहित आहे हे प्रतिभेचे अधिष्ठान आहे म्हणून . थोडेफार शब्दांशी खेळणे सवयीने किंवा सरावाने होत असेल पण विषय हा सुचावाच लागतो. आणि त्यासाठी हे प्रतिभेचे अधिष्ठान मान्य करायलाच हवे . या अडीच महिन्यांच्या कालखंड लिहिण्यात खंड दोन वेळा खंड पडला तो टेबल पर्यंत यायला प्रकृती साथ देत नव्हती म्हणून . वरना तामान्नाये और ख्वायीशे दिलमे अभी बाकी आहे.
दिसामाजी काही वाचले जावे हे गेल्या काही वर्षात पाळत आलो आहे तर आता दिसामाजी काही लिहित राहावे व हात लिहिता राहावा अशी इच्छा आहे. यामुळे मला अशी पण प्रतिक्रिया मिळाली की काही नित्य नवे व चांगले मराठी समाज माध्यमांवर वाचायची सोय झाली आहे. ही प्रतिक्रिया निश्चित प्रेरणादायी आहे आणि त्या मुळे जबाबदारी पण वाढली आहे.
पुल म्हणायचे साठी नंतर शरीराचा कुठला ना कुठला भाग हा दुखतच असतो. एखाद्या सकाळी जर तुमच्या शरीराचा कोणताच भाग दुखत नसेल तर खुशाल समजा तुम्ही जिवंत नाही. याचाच दुसरा अर्थ वेदना , आजार ही जिवंत असल्याची लक्षणे आहेत व त्यांचा सामना औषधे आणि इच्छा शक्ती यांच्या जोरावर केला पाहिजे.त्यासाठी शायरी, कविता यांची पण साथ घेता आली पाहिजे.
हे कम्बख्त खुदा
चाहे कितनी भी परेशानिया बढ जाये
हौसला तो मेरा ही होगा.
चाहे नींद उड जाये
ख्वाबोन्को आना कैसे रोकोगे
गमोन्की वजहसे आसू सुख जाये
दिलमे दर्द तो रहेगा ही
चाहे अपने पराये हो जाये
परायोन्का अपनापन धुंड लेंगे.
चाहे तुने तेरी दुनियामे अंधेरा फैलाया हो
कुछ चिराग तो हमने भी जलाये है
जानता हु ये दुनिया तेरी बसायी ही
तो हम भी तो तुम्हारी ही औलाद है
भरोसा कर हे खुदा
जिंदगी चाहे तुम्हारी दी होगी
पर जीनेका तरीका हमने धुंडा ही.
लिखने मी कुछ गुस्ताखी हुयी
तो माफ कर देना .
अनिल जोशी
०५.०३.२०२०
आपली प्रतिक्रिया कृपया आपल्या नावासह द्यावी

सुंदर. अस जमल तर जीवन सुंदर आहे.
ReplyDeleteराजा आपटे
नियमित वाचन व बैठक मारून उत्स्फूर्त लिखाण यामुळे रंजकता आहे. Keep it up.👍
ReplyDelete