बिनाका गीतमालाच्या निमित्ताने

Veteran Radio presenter Ameen Sayani During An Interview : News Photo
बिनाका गीतमाला हा १९५३ मध्ये सुरु झालेला सिलसिला १९९३  मध्ये संपला. म्हणजे रेडियो कार्यक्रम समलं. कोणत्याही चांगल्या गोष्टीला शेवट हा असतोच. यामागे अनेक कारणे आहेत. एक तर रेडियो हे करमणुकीचे एकमेव साधन हे त्याचे स्थान गेले होते. घरोघर दूरदर्शन आले होते. त्याबरोबरच सिने संगीताने पण एक वेगळे वळण घेतले होते. शब्द ,सूर, लय, काव्य यांचा सुरेख संगम असलेली गाणी नंतर भावानेच निघू लागली. तंत्राने त्यातील नैसर्गिकता संपवली. आधी धून मग शब्द हे सर्रास सुरु झाले. हा बदलत्या काळाचा महिमा होता. चांगले वाइट हा प्रश्नच नाही पण बिनाका गीतमालाचा म्हणून जो काळ होता त्याच्याशी हे विसंगत होवू लागल्याने हा कार्यक्रम थांबवण्यात शहाणपण होते त्या मुळे या काळाच्या स्मृती तशाच सुगंधित राहिल्या. आज पण तरुणाई या कार्यक्रमाच्या क्लिप्स यु ट्यूब वर ऐकते. अमीन सयानी हे नाव आज ही आठवले जाते. खरे तर हा कार्यक्रम पूर्णपणे व्यावसायिक होता. पण याच्या दर्जावर, सादरीकरणावर कुठेही याचा अनिष्ट परिणाम झाला नाही. या साठी रेडियो सिलोन व प्रायोजक सिबाका कंपनी यांचे आभार मानायला हवेत. एक सुंदर दर्जेदार निर्मिती थोडी थोडकी नव्हे तर चाळीस  वर्षे सुरु ठेवण सोपं नव्हत. पुल एकदा म्हणाले होते की जे संगीत लोकांमध्ये जास्त अवडल जात ते खरे लोक संगीत आणि त्या दृष्टीने चित्रपट संगीत हे आजच्या काळातील खर्या अर्थाने लोक संगीत आहे. हा तीस वर्षांचा काळ जादुई आणि सुरेल करणाऱ्या बिनाका गीत मालास प्रणाम.

अनिल जोशी
०७.०३.२०२० 
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी 

Comments

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती