माझी ब्लॉग साठी प्रेरणा - भाऊ तोरसेकर -१०० वे पुष्प.
जगता पहारा - भाऊ तोरसेकर

२०१४ मध्ये जून किंवा जुलै मध्ये असेल माझ्या हातात त्यांचे मोदीच का हे पुस्तक आले. आणि मी ते वाचतच गेलो. कारण ज्या घटना २०१४ च्या मे महिन्यात घडल्या होत्या त्याचे साधार भाकीत त्यांनी २०१३ च्या पूर्वार्धातच केले होते आणि पुढे ते पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाले. आणि २०१३ च्या आधी ची राजकीय परिस्थिती लक्षात घेतली तर हे असे भाकीत वर्तवणे हे धाडस होते. पण भाऊ ते करू शकले कारण त्यांच्या विश्लेषणावर, अभ्यासावर त्यांचा विश्वास होता आणि या मध्ये त्यांचा कोणताही व्यक्तिगत स्वार्थ नव्हता. त्यांच्यातील जाणकार पत्रकाराने मिडीयाने २००२ पासून जी मोदी विरोधी मोहीम उघडली होती तिचा सूक्ष्म पाने अभ्यास करून जी निरीक्षणे जाणकार पत्राक्रांनी मांडायला हवी होती ती न मांडता त्या खेळात सगळे रमून गेले होते. आणि हे सर्व बुद्धीवादी, ताज्कीय निरीक्षक एकच गोष्ट लक्षात घेत नव्हते ती म्हणजे जनतेला , सर्व सामान्य मतदाराला काय हवे ? आणि भाऊ नेमकी हीच गोष्ट लक्षात घेत होते.
मी पण या परिस्थितीचा थोडाफार अभ्यास करत होतो. २००९ साली निवडणुकीत भाजप ला संधी असून त्यांनी गमावली . एक म्हणजे अडवाणी यांचे नेतृत्व सामान्य मतदाराला आकर्षित करणारे नव्हते व कम्युनिस्ट पक्षाने मनमोहनसिंग सरकार वर अणु कराराला विरोध म्हणून जो अविश्वास प्रस्ताव आणला त्याला भाजप ने पाठींबा देवून आत्मघात करून घेतला. यामुळे सरकार पडले नाहीच पण मतदारांमध्ये एक वेगळा संदेश गेला . आणि तसेही सरकारची मुदत संपणार असताना या प्रस्तावाचे काही प्रयोजन नव्हते . आणि जर भाजप सत्तेत असता तर त्याने हा करार केलाच असता. मग कम्युनिस्टांच्या मागे जाण्यात कोणते शहाणपण होते? त्या मुळे पुन्हा कॉंग्रेस सत्तेत येणार हा माझा अंदाज होता आणि तो खरा ठरला की कॉंग्रेस ला पूर्ण बहुमत मिळाले.
२०१२ मध्ये मी गणपती साठी कोकणात आमच्या गावी गेलो असता सगळे पक्ष व त्यांची राज्यनिहाय स्थिती याचे विवेचन करणारा एक मोठा लेख लिहिला व तो किस्त्रीम चे संपादक विजय लेले यांच्याकडे दिला. तो छापून येईल अशी अपेक्षा नव्हती. पण एका संध्याकाळी बस मधून घरी येताना एआणि एक फोन आला आणि त्या व्यक्तीने तो लेख वाचून आवडल्याचे सांगण्यासाठी फोन केला होता. तेव्हा आपला लेख किस्त्रीम मध्ये प्रसिद्ध झाला आहे हे समजले. मग अनेक फोन येत राहिले. असंच एक फोन जानेवारीच्या २०-२२ तारखेच्या सुमारास आला. डॉ नेने म्हणून बडोद्याहून फोन होता. सुरुवातीचे बोलणे झाल्यावर मी त्यांना सहज विचारले बडोद्याला एक डॉ नेने आहेत जे पूर्वी सोबत साप्ताहिकात दादुमिया नावाने लिहित असत. त्यावर ते म्हणाले मीच दादुमिया. हा फार मोठा बहुमान होता. पण ते तेवढ्यावरच थांबले नाहीत. ते म्हणाले मी पुढील आठवड्यात पुण्यात येतोय तेव्हा तुम्हाला व विजय लेले यांना भेटायचे आहे. ती एक अविस्मरणीय भेट झाली त्यावेळी राजकीय स्थितीबद्दल बोलणे झाले तेव्हा मोदी ही निवडणूक गाजवणार असे दिसत असल्याचे ते म्हणाले. मोदी शिकायला बडोदे येथे असताना ते दादुमिया यांच्याकडे राहत असत आणि त्यांच्याशी मुख्यमंत्री असताना पण त्याचा चांगला राबता होता. हे सगळ लिहिण्याच कारण म्हणजे मोदी पूर्ण बहुमत मिळवतील असे ठाम पाने कुणी म्हणत नव्हते.
पुढे डिसेंबर २०१३ मध्ये खासदार प्रकाश जावडेकर यांच्याशी अनौपचारिक गप्पांचा योग आला होता तेव्हा पण तसा विश्वास जाणवत नव्हता. दरम्यान २०१३ च्या किस्त्रीम दिवाळी अंकात मी जो लेख लिहिला होता त्यात असे म्हटले होते की जो लाट निर्माण करेल तोच जिंकेल. आणि ती शक्यता मोदी यांच्याकडे जास्त आहे. २०१३ मध्ये पुणे शहरातील काही भाजप कार्यकर्त्यांशी बोलताना असे जाणवले होते की पुणे शहर भाजप मध्ये खूप विस्कळीत पणा आहे.
२०१३ मधील ही सगळी स्थिती विस्ताराने द्यायचे कारण म्हणजे भाजप ला संधी आहे पण पूर्ण बहुमताचा विश्वास वाटत नव्हता आणि अशा वेळी भाऊ ठाम पणे सांगत होते मोदी पूर्ण बहुमताने येणार. पुढे एकदा ते म्हणाले पण होते मुंबई मधील काही भाजप नेते त्यांना म्हणाले होते की भाऊ, आमच्या पेक्षा तुम्हालाच जास्त आत्मविश्वास आहे.
असे हे भाऊ. यांचा जगता पहारा रोज नित्य नियमाने वाचत होतो, मित्रांना सांगत होतो. आपल्याला लिहावेसे वाटले तर कुणी छापेल याची वाट न पाहता त्यांनी हा ब्लॉग चा पर्याय निवडला. व मला पण जेव्हा असे वाटले की आपण पण बरेच काही लिहू शकू तेव्हा हा ब्लॉग लिहायला सुरुवात केली व सुरुवातीला म्हटल्या प्रमाणे हे १००वे पुष्प प्रेरणा देणाऱ्या भाऊंना समर्पित .
अनिल जोशी
०१.०४.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी.

अप्रतिम सहज सुंदर शब्दात व्यक्त झाला आहात..
ReplyDeleteआपल्या ब्लॉग लेखाच्या शतकपूर्ती बद्दल मनापासून अभिनंदन..
आता वाटचाल द्विशतकाकडे ...त्यासाठी मनापासून शुभेच्छा...
धनश्री जोशी
Congratulations on your 100th blog. Unfortunately haven't read all but some. Always interesting to read. May you. Continue this for many more centuries!
ReplyDeleteKishor
प्रिय अनिल
ReplyDeleteतुझा ब्लॉग लेखनाचा उपक्रम आणि सातत्य निश्चितच अनुकरणीय आहे त्यातून तू ज्यांना गुरु म्हणला आहेस ती मला वाटतं महाराष्ट्रातील एकमेव व्यक्ती आहे जी निर्भीडपणे पत्रकारिता करू शकते मला तुझा अभिमान वाटतो