पत्र अनामिकेच
जर्मन कादंबरीकार स्टेफन त्स्वाएग (१८८१-१९४२)
ही कादंबरी १९२२ मध्ये प्रकाशित झाली होती.
My child died yesterday – for three days and three nights I fought with Death over this small, tender being, for forty hours I have sat beside his bed while the flu wracked his poor, hot body with fever. I put cool compresses on his burning forehead, I held his restless little hands day and night. In the third evening I collapsed. My eyes couldn’t stay open any longer, they closed without my being conscious of it. I slept for three or four hours on the hard chair, and meanwhile Death had taken him away. Now he is lying there, the sweet, poor little boy in his small child’s bed, exactly as he was when he died; just his eyes have been closed, his clever dark eyes, his hands have been folded over his white shirt, and four candles are burning at the four corners of his bed. I don’t dare to look away, I don’t dare to move, for when the candles flicker they send shadows flittering across his face and closed mouth, and then it’s as if his expression changes, and I can imagine that he wasn’t dead, that he would wake up again and with his clear voice say something childishly tender to me. But I know that he is dead; I no longer want to look there so as not to continue hoping, not to be disappointed once again. I know, I know, my child died yesterday – now I only have you left in the whole world, only you, the you who doesn’t know me, the you who in the meantime was unsuspectingly playing or trifling with things or with people. Only you, the you who never known me and whom I have always loved.
आज ब्लॉग च्या सुरुवातीलाच इंग्लिश मजकूर म्हणजे थोडं वेगळ वाटत. पण त्याला पार्श्वभूमी तशीच आहे. वर उल्लेख केलली अ लेटर फ्रॉम अननोन वूमन ही छोटेखानी कादंबरी १९७८ च्या सुमारास माझ्या हातात मित्र सुरेश खैरनार यांच्यामुळे पडली अगदी एकदम मस्तच आहे या अभिप्रायासह. हे एका जर्मन कादंबरीचे इंग्लिश भाषांतर होते. वर दिलेला पहिलाच परिच्छेद वाचला आणि तो मला अजिबात परकीय वाटला नाही . पुढे पण जसे वाचत गेलो तसे ते पत्र माझ्या मन:चक्षूंसमोर मराठीत येवू लागले . याच परिच्छेदाची ही झलक.
"माझा मुलगा कर वारला. गेले तीन दिवस आणि तीन तीन रात्री त्या छोट्या जीवासाठी मी मृत्यूशी झगडत होते. फ्लू च्या तापाने फणफणलेल्या त्याच्या शारीराशेजारी मी ४० तास बसून होते त्याच्या कपाळावर थंड पाण्याच्या घड्या ठेवत होते. त्यांचे इवलेसे हात मी रात्रंदिवस हातात धरून होते. तिसर्या दिवशी मात्र मी कोसळले. माझ्या इच्छेविरुद्ध डोळ्यांनी असहकार पुकारला आणि ते मिटले. साधारण तीन ते चार तास मी त्या लाकडी खुर्चीवर झोपले होते आणि त्याच अवधीत मृत्यूने त्याच्यावर झडप घातली. आता तिथे तो तसाच पडला आहे. बिचार गोड पिलू आपल्या छोट्याशा बिछान्यावर. त्याचे ते पाणीदार काळेशार डोळे आता मिटलेले आहेत. हात त्याच्या पांढर्या सदर्यावर स्थिरावले आहेत. आणि चार मेणबत्त्या त्याच्या बिछान्याच्या चार दिशांना तेवत आहेत. तिकडे पहायचे माझे धाडस होत नाही ,तिथून हलता पण येत नाही. त्या मेणबत्त्यांच्या ज्योती फडफडत असताना त्याच्या सावल्याच्या छटा चेहऱ्यावर व मिटलेल्या तोंडावर भिरभिरत आहेत. मला अजून वाटत आहे तो जिवंत असून तो पुन्हा जागा होईल आणि आपल्या बाळ लीलांनी आणि त्याच्या बालिश आवाजाने मला बोलावेल. पण तो आता गेला आहे हे मला समजून चुकले आहे. पण मला तिकडे पहायचे नाही कारण त्यामुळे वेडी आशा जागी होवून पुन्हा मला निराशेच्या गर्तेत जावे लागेल. मला माहित आहे , माहित आहे माझा बच्चा काळ गेला. आता माझ्या जगात फक्त तू उरला आहेस. तू मला ओळखत पण नाहीस, तू नी:संशयपणे लोकांशी व लोकांच्या भावनांशी लीलया खेळतोस. फक्त तू. तू ज्याने मला कधीच ओळखले नाहीस आणि मी मात्र तुझ्यावर सतत प्रेम करत राहिले."
(हे भाषांतर आता केलेले आहे. त्या वेळी केलेले कदाचित थोडे वेगळे असू शकेल.)
ही झलक अशासाठी दिली की नंतर सुमारे दोन महिने ऑफिस व अन्य अवधाने सांभाळून ह्या कादंबरीच्या मराठी भाषांतराच्या कामात झोकून दिले. एका वहीत ते पत्र अनामिकेच शब्दबद्ध झालं. अनेकांनी वाचल, त्यांना आवडले , पण पुढे काहीच घडले नाही.
१९८१ मध्ये कालासागारच्या पहिल्या दिवाळी अंकासाठी जमवाजमव सुरु होती आणि मी हे पत्र अनामिकेच अंकात प्रसिद्ध कराव असा विचार मांडला. आमच्या संपादक मंडळाने तो मान्य केला आणि ती वही कंपोझिंग साठी प्रेस ला गेली. त्या काळी टाईप वापरून फोर्म व्हायचे. ते फॉर्म (८ पाने) छापून झाले की टाईप मोकळा करून पुढच्या फॉर्म साठी वापरायचा. पत्र अनामिकेच हे ओपनिंग ला होते. म्हणजे २-३ पाने सुरुवातीला छापून उर्वरित शेवटच्या फॉर्म मध्ये छापायचे ठरले . १६ फॉर्मच्या अंकात १४ वा व १५वा फॉर्म यासाठी मुक्रर केला होता शेवटच्या दिवशी पाने लावता लावता असे लक्षात आले की मजकूर बाहेर जातोय. या पत्रात अनेक गोष्टींचा उल्लेख पुन्हा पुन्हा होत होता. मग आमचे जयंत जोशी यांनी त्या मजकुरावर अक्षरश: कुर्हाड चालवली व मजकूर त्या दोन फॉर्म मध्ये बसवला. नंतर ते म्हणाले तुमच्या या पत्राने घाम काढला.
अंक प्रकाशित झाला त्यात पत्र अनामिकेच ही कादंबरी दीर्घ कथेच्या रुपात प्रकाशित झाली. एका सहकार्याने यावर दिलेली प्रतिक्रिया बोलकी होती. तो म्हणाल अरे काय तुझी कथा सगळा सुटीचा दिवस संपला पण वाचतच होतो. तरी पण कथा एकदम भारी आहे.
या घटनेला ३५ वर्षे उलटून गेली. मग एक कथा संग्रह प्रसिद्ध करण्यासाठी कथांची जमवाजमव सुरु होती. कथा निवडल्या. त्यांची प्रुफे तपासायला आली. आणि मी पुन्हा ते पत्र अनामिकेच वाचू लागलो. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. मला पुन्हा एकदा त्यातील पुनरुक्ती जाणवली मग मीच पुन्हा ती दीर्घ कथा एका कथेच्या रुपात संपादित केली. जर यादाकादाचीत तो कथा संग्रह प्रकाशित झालाच तर ती कथा म्हणून प्रसिद्ध होईल.
असा आहे हा कादंबरी ते कथा हा प्रवास. हे सगळ आज लिहिण्याला निमित्त झाले माझी बहीण शोभना हिने माझे ब्लॉग वाचून आता पत्र अनामिकेच वर लिही अशी फर्माईश केली व आज हा ब्लॉग लिहिला गेला.
मला वाटत ब्लॉग साठी कुणाकडूनही ही फर्माईश येण हे चांगले लक्षण ब्लॉग साठी चांगले आहे.
अनिल जोशी
१३ ०४ २०२०
आपली प्रतिक्रिया कृपया आपल्या नावासह द्यावी.

Touching.
ReplyDelete