एक अविस्मरणीय चित्रपट रोमन हॉलिडे




अतिशय कंटाळलेली आणि सतत आई वडिलांच्या छत्राखाली असलेली राजकन्या जेव्हा रोम ला येते तेव्हा ती तेथून चक्क पळ काढते. तिथे तिला एक अमेरिकन पत्रकार भेटतो . आपले लांब सडक केस कापून व ठराविक राजमान्य पेहराव बदलून ती एक सामान्य मुलगी बनते. या पत्रकाराला ठाऊक असते की ही कोण आहे पण तिचे गुपित तो जपतो आणि तिला वेगळ्या रीतीने रोम ची सैर घडवतो.

१९५३ मधील हा कृष्ण धवल चित्रपट ग्रेगरी पेक व ऑड्रे हेपबर्न यांच्या नैसर्गिक आणि नितांत सुंदर अशा अभिनयाने सजलेला आहे. छान हलके फुलके कथानक, विल्यम वायलर यांचे उत्कृष्ट दिग्दर्शन व रोम चे आगळे वेगळे दर्शन या मुळे हा चित्रपट कृष्णधवल असला तरी पूर्ण समाधान देतो. हा चित्रपट म्हणजे अचाट विनोद व अबोध निष्कपट प्रेम यांचा सुंदर संगम आहे.
जोन डायटन व डाल्टन ट्रमबो यांच्या मूळ कल्पनेवर आधारित चित्रपटाने एका पिढीवर राज्य केले. हेपबर्न व पेक यांनी कथेच्या परमोच्च बिंदूत आपल्या परिपक्व अभिनयाने बहार आणतात कारण ही नेहमीची सुखांत प्रेमकथा नाही.

मी हा चित्रपट १९७८ मध्ये पहिला. ऑफिस नंतर ६ चा शो पहिला पण मन भरलं नव्हत. मग सुटीच्या गुरुवारी अगाउ तिकीट काढून आणखी काही जणांना उद्युक्त करून वेस्ट एंड च्या प्रशस्त बाल्कनी मध्ये तेथील केनिंग च्या लांब हात असलेल्या आरामशीर खुर्चीवर बसून शब्शश: अनुभवला.
काढीत तरी सवडीने यु ट्यूब वर पुन्हा पहायचा संकल्प आज सोडतो.

अनिल जोशी
१४.०४.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी. 

Comments

  1. खरोखरच अप्रतिम चित्रपट. हाॅलिवूड चित्रपटांची खरी जादू काय आहे याचा हा चित्रपट उत्तम उदाहरण आहे.

    ReplyDelete
  2. मी हा चित्रपट १०/१२ वेळा पाह्यला असेल, पण अजूनही मन भरत नाही. त्याचं गारुडच तसं आहे.

    ReplyDelete
  3. मीसुद्धा हा चित्रपट अनेक वेळा पाहिला आहे. ऑड्री जेव्हा स्वतःच्या देशातून आलेल्या गुप्तहेराच्या डोक्यावर गिटार फोडते तो शॉटही क्लायमॅक्स प्रमाणेच लक्षात राहतो.
    त्यावर आधारित चोरी चोरी हा चित्रपट आपल्याकडे गाजला. त्यातील गाणीही अप्रतिम होती पण रोमन हॉलिडे एकमेवाद्वितीयमच!

    ReplyDelete
  4. नक्की बघेन हा चित्रपट

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती