तळीराम यांचा एक्स्क्लुझिव इंटरव्ह्यू

Image result for images of drunk person

पत्रकार व्हायची तशी माझी खूप इच्छा होती. पण काही कारणाने योग जुळून येत नव्हता. पण कधी कधी काही अनपेक्षित गोष्टी घडून जातात. नव्यानेच सुरु झालेल्या एका न्यूज चानेल ने मला चीफ रिपोर्टर म्हणून नेमले. मग काय केमेरा मन सोबत जायचे व ज्या घटना दिसतील त्या सनसनाटी करून दाखवायच्या असा उद्योग सुरु झाला. काही ठिकाणी आगाउ प्रश्न विचारले म्हणून पळ काढायचा पण प्रसंग आला. पण काही तरी भन्नाट घडण्यासाठी थोडे धाडस करावे लागतेच. असे दोन आठवडे उलटून गेले. मग मुख्य व्यवस्थापकांनी मला बोलावून सांगितले की तुमची पत्रकारिता म्हणजे पोरखेळ चालू आहे . तेव्हा काही तरी वेगळे करून दाखवा. त्या संध्याकाळी मी निराश होवून बार मध्ये गेलो. एक पतियाळा पेग लावला. आजूबाजूला सहज नजर टाकली तर काय एका टेबलवर तळीराम बसले होते. हो. तेच एकच प्याला मधील तळीराम. जगातील सर्व मद्यपीमध्ये सर्वात जास्त बदनाम झालेले मद्यपी. मला त्यांची करुणा आली. मी त्यांच्या जवळ गेलो. एक दोन प्रश्न विचारले तर ते बोलायला उत्सुक दिसले. मला ते उपेक्षित वाटले व सध्याच्या मद्यप्यांच्या झगमगाटात या उपेक्षित माद्यप्याची व्यथा मांडायला हवी असे वाटले. मी त्यांना विचारले की तुम्ही आमच्या चेनेल ला मुलाखत द्याल का? ते म्हणाले चालेले. पण माझ्या पोटातली दारू संपली की मी अस्वस्थ होतो. जेव्हा टाकी फुल असेल तेव्हा मी नॉर्मल असतो. मग दुसर्या दिवशी भेटायचे ठरले. 
दुसर्या दिवशी सकाळीच आमच्या व्यवस्थापनाला या मुलाखती बाबत सांगितले. ही भन्नाट कल्पना त्यांना मान्य झाली. ही मुलाखत रेकॉर्डेड दाखवायची . म्हणजे काही अंश काही दिवस जाहिरात म्हणून दाखवून याची हवा करायची. शिवाय प्रत्यक्ष पडद्यावर कुठे मद्यपान दाखवायचे नसल्याने मद्यपान आरोग्यास घातक आहे असा वैधानिक इशारा दाखवायची गरज नव्हती. तसे अधून मधून तळीराम टी पॉय वरील तांब्यातून अधून मधून पाण्याचे घुटके घेवून आपली अल्कोहोल पातळी कायम ठेवतील इतकेच.

मुलाखतीचा दिवस उजाडला. तळीराम यांना स्तुदिओ मधील त्यांच्या मापाचा एक सफारी घालायला दिला. आमच्या मेक अप मन ने त्यांचा छान मेक ओव्हर केला होता. आता ते एक बिझिनेस एक्झिक्युटिव वाटत होते.

मुलाखत सुरु झाली.

प्रश्न : तुम्ही तसे आद्य मद्यपी पण कायम अवहेलनाच तुमच्या वाट्याला आली.
उत्तर: त्याचे काय आहे ,मला ज्यांनी जन्माला घातले ते गडकरी मास्तर यांनी विशिष्ट हेतूने हा तळीराम उभा केला त्याचे हे भोग आहेत दुसर काय?
प्रश्न: त्या काळात चोरून गाळलेली हात भट्टी ची दारू होती आणि आजच्या जमान्यात दारूचे विपुल प्रकार राजरोस उपलब्ध आहेत यावर तुमचे मत काय?
उत्तर: सुरुवातीला या सगळ्या प्रकारांकडे मी तुच्छतेने पाहत असे. कारण हातभट्टी ती हातभट्टी या मतावर मी ठाम होतो. पण एकदा उन्हाळ्यातील दुपारी एका अशाच हितचिंतकाच्या आग्रहाने मी बिअर प्यायलो आणि त्या थंडगार पेयाने खरोखर माफक नशा आणि वेगळाच आनंद दिला. 
प्रश्न : एकदम हातभट्टी वरून बिअर म्हणजे तशी क्रांतीच. पण हा बदल कसा वाटला ?
उत्तर: खर सांगायचं तर हे सगळ मानसिक असत की अमुक दारू चढते तमुक बेकार वगैरे. एकदा का हा मानसिक अडथळा दूर झाला की धुवाधार पावसात छान रम ची मजा घ्यावी. गुलाबी थंडीत व्हिस्की ची मजा घ्यावी. उन्हाळ्यात बिअर ची मजा घ्यावी. कधी सुरुवातीला चढत नाही वाटणारी पण नंतर झपकन चढणारी जीन प्यावी. व्होडका बरोबर वेगवेगळी कॉकटेल एन्जोय करावीत. बाटली उघड्ताच उसळणार्या फेसाची शाम्पेन घ्यावी. वेगवेगळे ब्रांड ट्राय करावेत.
प्रश्न : अरे वा तुम्ही तर या विषयातील पी एच डी घेतल्यासारखे बोलताय . अर्थात तुमचा तो अधिकार आहेच. पण दारू ही प्रकृतीला घातक म्हणतात हे कितपत योग्य वाटते?
उत्तर: कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा आरोग्याला घातकच. एखाद्या गोष्टीची मजा घायची की तिच्या आहारी जायचे यावर हे अवलंबून असते.
प्रश्न: तुम्ही आमच्या प्रेक्षकांना खूप महत्वाची माहिती दिलीत व तुमचा या बाबतचा दृष्टीकोण पण सांगितला. एक आद्य मद्यपी म्हणून तुम्ही सर्व मद्यप्यांना काऊ सांगाल?
उत्तर: आयुष्य हे मजेत जगण्यासाठी आहे तेव्हा दारूची पण भरपूर मजा घ्या. पण त्याच्या आहारी जावू नका. आणि आणखी एक महत्वाचे म्हणजे बरोबर चकणा म्हणून जे तेलकट वगैरे खाता ते न खाता उकडलेली अंडी, चीज ,गाजर, काकडी अशा गोष्टी खा. व जीवन समृद्ध करा.
या नंतर त्यांच्या शरीरातील अल्कोहोल पातळी खूपच खालावल्याने आभार वगैरे न मानता ही (काल्पनिक) मुलाखत संपली.
अनिल जोशी
१५.०४.२०२०

कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी.

Comments

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती