कवितेची संध्याकाळ
संध्याकाळ तशी रोजचीच. पण ती वेगळी अणि चांगली व्हायला हवी असेल तर तिला आपलस कराव। त्या हळुवार कातर वेळेची कातरता आपल्यात सामावून घ्यावी. तिच्याची अलवार हितगुज कराव। तिने घातलेले कोड़े हळुवार उलगडून त्याच्या सुन्दर पाकळ्या पाकळ्या कराव्यात.
अशी संध्याकाळ आपल्या कानात कुजबुजून आपली चाहुल देते. त्याला हुंकार देवून फक्त दाद द्यायची। तिच गुज आपल्या मनी आणि आपल तिच्या मनी शब्दाविनाच पोचवायच. कारण शब्दाना अर्थ असतो, आकार असतो, अर्थाचा अनर्थ करण्याची मोठी शक्ति शब्दांमधे असते. त्या मुळे आपला कवितेशी संवाद हा शब्दांच्या वाटेला चुकवून गुपचुप करावा.
मग हळू हळू कविता खुलत जाईल. मोकळ्या पाकळ्या अनामिक धाग्याने गुंफल्या जटिल. त्यातील पराग कणांचा सुगंध फक्त आपल्यालाच जाणवेल. तिच्या भावना तिच्या काकणातून किणकिणतिल. फक्त हे जाणवण्यासाठी आपली वृत्ती सजग हवी। जसजशी संध्याकाळ गहिरी होत जाईल तेव्हा ती आपोआप आपल्यासमोर शब्दकळा लेवून सामोरी येईल.
ही सांज अवतरली फक्त आपल्यासाठी.
अकाशाने ल्यायलेले कृष्ण वस्त्र
जणू तुझ्यातील अभिसारिका राधेसाठी
तर मंद वाहणाऱ्या शीत वायु लहरी
विरहाग्निला चेतवण्यासाठी
संधी प्रकाशातील अस्फुट तू
अंधारात मात्र दीपशिखा
धुडकावून प्रकाशाला
अंधारास केलेस जिवलग सखा
एकदा निशा प्रसन्न झाल्यावर
रात्र सगळी घुंगूर वाळी
सगळे विभ्रम सगळे कटाक्ष
ही तर तुझी खास अस्त्रे
मी तर सदैव घायाळ
कारण हीच असते कवितेची संध्याकाळ
अनिल जोशी
१७. ०४ २०२०
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी
Comments
Post a Comment