बखर एका मनस्वी राजाची


बखर : एका राजाची

बखर एका राजाची ही त्र्यंबक वि सरदेशमुख यांची कादंबरी १९७२ मध्ये मौज प्रकाशन ने प्रकाशित केली. माझ्या हातात ती अगदी वेगळ्या योगायोगाने पडली. श्री. सरदेशमुख यांचे एक स्नेही टी एस जोशी यांना ही कादंबरी अर्पणकेली होती. आणि त्यामुळे मित्र किरण याने त्याच्या वडिलांकडे आलेली कादंबरी मला वाचायला दिली.तेव्हा वाचलेली ती कादंबरी आज ही लक्षात आहे ती त्यातील वैविध्यपूर्ण व्यक्तिरेखांमुळे. ही एका राजाची गोष्ट हेनावावरूनच लक्षात येते. पण हिला गोष्ट न म्हणता बखर म्हटले आहे. अशा बखरी या राजे , सरदार यांचे कारभारीलिहीत असत. त्यात स्तुतीचा भाग असे तो सोडला तरी तत्कालीन दस्तऐवज म्हणून त्याचे महत्व आहेच .अर्थात त्यामुळे बखर वाङ्मयाला महाराष्ट्रात महत्वाचे स्थान आहे
तर कोल्हापूर नजीकच्या एका छोट्या संस्थानिकांची ही कथा आहे . त्याच्या आयुष्यात एक शापित अप्सरा राजस येते.शापित अशासाठी की सर्वांच्याच तिला बहिष्कृत केले आहे. पण कोल्हापूर संस्थानात शाहू महाराजांचे राज्य असल्यानेतिचे शिक्षण मात्र सुरु राहते. संक्रांतीच्या दिवशी ती राजवाड्यावर तीळ गूळ द्यायला येते पण महिलांमध्ये ती सवाष्णनसल्याने तिला स्थान नाही . तेव्हा ती सरळ महाराजांना तीळ गूळ द्यायला येते . ही त्यांची पहिली भेट.
याचे वर्णन मुळातच वाचूया.
काल संध्याकाळी माझी गजबज झाली .माझ्या एकलेपणाला अंकुर आला. पडसाद देणाऱ्या भूमीवर मी उभा आहे हे एकाएकी दिसून आलं. तेवढ्या वेळात तिने काय काय सांगितलं ते वेचता वेचता आणि गुंफता गुंफता माझी पुरेवाट झाली .एका लहानशा सुकुमार आयुष्याला एवढ्या जळवा लागलेल्या असू शकतात माझ्या स्वप्नात ही नव्हत .
तिला प्रथमच पाहिली  तेव्हा तिच्या डोळ्यातल्या  निळसर पाण्यावर माझ क्षितीज ओठंगत आहेसं मला वाटत आलं.
सुरुवातच अशी तरल तर भेटी किती गहिर्या असतील याची कल्पनाच केलेली बरी.
आणि जशाभेटी वाढू लागतात तशी प्रेम कथा बहरू लागते.
ही कथा पण शापित आहे. कारण राजा तसा नामधारी आहे. ब्रिटिश रेसिडेंट , कारभारी आणि राणी सरकारअशा अनेकसाखळदंडांनी त्याचे व्यक्तिमत्व बंदिस्त आहे. मोकळे आहे ते त्याचे उमदेपण आणि मनस्वी पण .हे सगळे बंध आणि त्याची मनस्वी बंडखोर वृत्ती यातील संघर्ष वाचकाला पानोपानी जाणवतो. ही जीवघेणी संघर्षाचीकहाणी मनाचा ठाव घेते आणि हा शापित राजा आणि त्याची शापित अप्सरा यांच्या प्रमाणे आपण पण हतबल आहोत
अशी भावना वाचकांमध्ये रुजते.
ही कहाणी सुखांत होणे शक्यच नसते पण प्रतिकूल परिस्थितीत पण राजा आपला मनस्वीपणा कसा टिकवून ठेवायचाप्रयत्न करतो आणि त्याला राजस अबला असून मनापासून कशी साथ द्यायचा प्रयत्न करते याचा आलेख म्हणजे हीकादंबरी .
या कादंबरीतील नाट्य जाणवल्याने टाटा मोटर्स कलासागरने या कादंबरीवर आधारित टाहो या नाटकाचा प्रयोग केलाहोता..
कादंबरी मुळातून वाचण्यासारखी आहे. माझ्या आठवणी प्रमाणे या कादंबरीचा उत्तरार्ध महाराजांचे सेक्रेटरी देसाई यांच्या मुलाच्या कथेतून साकारला आहे.

बखर : एका राजाची
Pages: 180
Weight: 214 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9788174869463

अनिल जोशी 
२१.०४.२०२० 
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी

Comments

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. I've read very little Marathi literature.,.other than Pu La. Makes me.want to read these stories in Marathi! It's amazing how you've captured the entire essence of the novel in a couple of paragraphs!!
    Swati Karve

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती