मार्केट मोल साखळी फसवणुची

ही माझी प्रकाशित झालेली दुसरी कादंबरी. काल पुस्तक दिनाच्या निमित्ताने बाहेर आली. आज तटस्थ पणे वाचताना मला त्यातील अनेक बलस्थाने  जाणवली. 
एक म्हणजे त्यातील पात्र योजना. अनुषंगाने हा महत्वाकांक्षी तरुण. त्याला साथ देणारी पण त्याच्या बाबतीत पझेसिव्ह असणारी मिताली, धूर्त व कावेबाज ब्रिजेश, त्याचा मतलबी साथीदार नंबियार, मुख्य सहभाग असलेला पण खुशालचेडू रमेश सिन्हा, अनुषच्या व्यक्तीमत्वावर फिदा झालेली सोनाली. 
या बरोबर कथानकाच्या अनुषंगाने आलेली स्थल वर्णने,ज्यात सिक्कीम,महालक्ष्मी मंदिरामागचा समुद्र, दिल्ली मधील करोल बाग,अजमल खान रोडवरील फुटपाथ बाजार,कॅनोट प्लेसचा झगमगाट,या सगळ्या गोष्टींचा कथानक पुढे न्यायला केलेला वापर, कथानक व्यावसायिक असले तरी काही उत्कट प्रसंग आणि मध्यवर्ती घटना प्रत्यक्ष अनुभवली असल्याने अचूक तपशील. या मुळे कादंबरी वाचनीय झाली असावी कारण दोनदा ती छापली गेली.
या कादंबरीने एक असा अनुभव दिला जो एखाद्या पुरस्काराएवढा आहे.मला जानेवारी मधे मिरज हून कुलकर्णी यांचं पत्र आलं. त्यात ही कादंबरी आवडल्याचे लिहिले होते शिवाय अशा आवडलेल्या लेखकाची सही व फोटो ते आपल्या संग्रही ठेवतात त्या साठी त्यानी माझा फोटो व सही मागितली होती. ती पोचल्यावर आभाराचे पत्र आले त्यात मिरजेला यायचे निमंत्रण पण होते. 
अनिल जोशी 
24.04.2020
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी.

Comments

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती