अंधारातून प्रकाशाकडे

अब मोबाइल से भी एलआईसी भुगतान | Now LIC ...
दिन चक्रातील अंधार व प्रकाश या दोन नित्य अनुभवाला येणाऱ्या अवस्था. दिवसामागून रात्र आणि रात्री नंतर दिवस हे चक्र अव्याहत चालू असते.
यात अंधार हे निराशेचे , नाकारात्मकतेचे प्रतीक आहे. आणि ती निराशा किंवा नकारात्मकता घालवण्यासाठी प्रकाशाचे प्रतीक म्हणून दिवा लावण्याची पद्धत आहे. यावरून लहानपणी ऐकलेली एक गोष्ट आठवली . एकदा एक गृहस्थ आपल्या दोन मुलांची परीक्षा पाहायला त्यांना एक छोटी रक्कम देतो व सांगतो की या रकमेतून काही पण वस्तू आणून आपली खोली भरून टाकायची. पहिला मुलगा बाजारात जातो पण खोली भरेल एवढ्या वस्तू त्या रकमेत येत नाहीत. तेव्हा तो निराश होतो आणि घरी येवून सगळी खोली कचर्याने भरून टाकतो.
तर दुसरा मुलगा आपली खोली स्वच्ह करतो आणि चारी कोपर्यात चार दिवे लावतो व ती खोली प्रकाशाने भरून टाकतो.
याचे तात्पर्य ज्याने त्याने आपल्या समजुती प्रमाणे घ्यावे.
आपल्या देशाच्या राजकीय अवकाशात असाच अंधकार पसरला होता. आणीबाणीच्या रूपाने लोकशाही अंधारात होती तेव्हा अशी घोषणा देण्यात आली की "अंधेरेमे एक प्रकाश, जय प्रकाश , जय प्रकाश. यातील राजकीय संदर्भ सोडला तरी कुठेतरी प्रकाशाची तिरीप दाखवून निराशेवर मत करता येते.
आपल्या संस्कृतीमध्ये दिवा हे मांगल्याचे प्रतीक मानले जाते. संध्याकाळी आपण देवाजवळ दिवा लावतो व अंधकाराला  सामोरे जायची तयारी करतो.
त्यातल्या त्यात तुपाचा दिवा हा जास्त मंगलमय मानला जातो पण तेलाचा दिवा पण तितकाच महत्वाचा. मेणाचा दिवा किंवा मेणबत्ती आपल्या संस्कृतीत बसत नाही पण तेजाची आणि प्रकाशाची उपासना करायला तो वर्ज नाही.
आता निराशेच्या गर्तेतून बाहेर पडायला कुणी दिवे लावा सांगितले तर त्यावर प्रतिक्रिया येते की गोर गरिबांच्या घरच्या चुली पेटायला हव्यात. वादासाठी हे अगदी बरोबर आहे पण माणूस आपली भूक भागवायला हात पाय हलावतोच. आणि ज्यांचा रोजगार बुडतो आहे त्यांना दोन वेळचे अन्न हे मिळालेच पाहिजे पण सगळ्या अवकाशावर जो निराशेचा , नकारात्माक्तेचा अंधार पसरला आहे त्यावर मात करायची शक्ती मिळावी म्हणून प्रकाशाची उपासना पण महत्वाची.
आणि ही केवळ प्रकाशाची नाही तर तेजाची उपासना आहे. आज १२ दिवस सगळे देशवासी एका संकटाशी झुंजत आहेत. त्यांच्या मनाला  कुठे निराशेने व नकारात्माक्तेने ग्रासू नये व प्रतिकाराची उर्जा मिळावी या साठी ही प्रकाश किंवा तेजाची पूजा.

अनिल जोशी 
०५.०४.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी.

Comments

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती