आम्हाला डॉक्टर हवेतच



Image result for images of doctorImage result for images of doctor


कोण्या एका सोसायटी मधील नागरिकांनी असे म्हटले की आमच्या सोसायटीत डॉक्टर नकोतच. या मागच्या कारण मीमांसेत न जाता असे नक्की म्हणावे लागेल की हे विधान किंवा मागणी ही पूर्ण चुकीची आहे. डॉ. केदार कुलकर्णी यांनी यावर काल फेसबुकवर खरमरीत पोस्ट टाकली त्या मुळे हा विषय समजला. त्यांनी टाकलेल्या पोस्ट नुसार अशी मागणी करणाऱ्या लोकांची मनोवैज्ञानिक चाचणी करणे जरुरीचे आहे याचाच दुसरा अर्थ अशी मागणी हे विकृत मनोवृत्तीचे लक्षण आहे. 
खर तर सोसायटी म्हणजे समाज. आणि समाज हा व्यक्तींपासून बनतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने दुसरी व्यक्ती समाजात नको म्हणणे हे हास्यास्पद आहे. आपले घर घेताना सामान्यपाने  आपला व्यवहार हा प्रवर्तक किंवा बांधकाम व्यावसायिकाशी होतो आणि तो व्यवहार उभयपक्षी फायदेशीर असेल तरच तो पूर्णत्वास जातो. त्यावेळी आपला शेजारी किंवा सहनिवासी कोण  हे आपण नाही ठरवू शकत. किंबहुना शेजारी चांगले नाहीत म्हणून घर बदलले असे क्वचितच होते. कारण घेतलेले घर बदलणे तितके सोपे नसते. 
या उलट आपल्या सोसायटीत कुणी गुंड, स्मगलर, बेकायदा धंदा करणारा नको असे आपण म्हणू शकतो का? आणि म्हटले तरी स्वत:पुरते कारण तसे उघड बोलायची आपली हिम्मत नसते. प्रत्येक व्यावसायिकाच्या व्यवसायाच्या काही मूलभूत मागण्या असतात.एखादा राजकारणी वा सामाजिक कार्यकर्ता असेल तर त्याच्या घरी येणाऱ्या जाणार्या लोकांचा राबता जास्त असतो. तीच गोष्ट वकिलांची किंवा क्लासेस वाल्यांची. त्यांचा मानला तर थोडा त्रास होतो पण सदैव लोकांचा वावर असल्याने जग पण असते. जर हॉस्पिटल असेल तर त्याचा वेगळा कचरा , क्वचित घडणारे मृत्यू याचा त्रास होवू शकतो पण एखादे हॉटेल असेल तर त्याचा कचरा, भातीमधील धूर याचाही त्रास होवू शकतो. पण म्हणून आमच्या सोसायटीत हा नको, तो नको हे म्हणणे चुकीचे आहे तसेच अव्यवहार्य आहे. 
आमच्या सोसायटीत तीन डॉक्टर राहणारे व दोन दवाखाने होते. त्यांचा त्रास सोडाच पण त्यांची आम्हाला वेळोवेळी मदतच झालेली आहे. 
सध्याच्या युगात फेमिली डॉक्टर ही संकल्पना झपाट्याने बाद होत असताना निदान एखादा तरी डॉक्टर सोसायटीत हवा असेच म्हणावे लागेल.

अनिल  जोशी
१६.०४.२०२०

आपली प्रतिक्रिया कृपया आपल्या नावानिशी द्यावी.

Comments

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती