पौर्णिमा ,पूर्ण चंद्र बिम्ब आणि चांदणे

Mysteries of full moonThis Weekend We Might See a 'Snow Supermoon'. Here's What That Means

 आज  चैत्री पौर्णिमा  म्हणजे हनुमान जयंती. आज मला १९७२ मधील एक आठवण येते आहे. परीक्षेचे दिवस होते. कॉलेज च्या पहिल्याच वर्षी एकटे व् स्वतंत्र रहायला मिळाले होते त्यामुळे या परीक्षेत चांगले यश मिळवून दाखवायची जबाबदारी होती. शिवाय परीक्षेनंतर मोठी सुटी तेव्हा घरी जायला मिळणार त्यामुळे अभ्यास करायला उत्साह आला होता. म्हणून माझा मित्र अनिल परांजपे याच्या घरी रात्री अभ्यासाला गेलो होतो. मजेत अभ्यास करत असताना लक्षात आल पहाटेचे ५ वाजत अले आहेत. आता तीव्रतेने चहा पाहिजे अशी जाणीव झाली। पण परांजपेचे घर म्हणजे पण ब्रह्मचार्याची मठी. तिथे चहाची सोय नव्हती. आणि अशा आड वेळेला चहा मिळण्याचे ठिकाण म्हणजे मंडई आणि त्याचे घर शुक्रवार पेठेत म्हणजे मंडई जवळ. मग आम्ही दोघे त्या दिशेने निघालो. आणि वाटेत अचानक कानावर सूर आले - रैना बीती जाए.  नुकताच अमर प्रेम पाहिला असल्याने गाणे ताजे होते. चहा पिवुन येताना लक्षात आल की आज हनुमान जयन्ती अणि त्यामुळे पहाटे स्पीकर सुरु झाले होते. कोणत्याही उत्सवाचा आणि उत्साहाचा अपरिहार्य भाग म्हणजे स्पीकर , सध्या डीजे लावतात. उत्सव /प्रसंग कोणता वाजणारी गाणी यांचा काही ताळमेळ असला पाहिजे ऐसे काहीच नसते। उत्सव आणि उत्साह महत्वाचा. 
एका रात्री सहज पार्टी करायचे ठरले. सतारा रोड वरील सौरभ या हॉटेल मधे आलो. तसा यायला थोड़ा उशीर झाला होता. फक्त ११ वाजले होते. जरा कुठे बैठक जमायला लागली तेव्हा वेटरने सांगितले जेवणाची ऑर्डर लगेच द्या. नंतर जेवण मिळणार नाही।  हा घोर अपमान होता. आम्ही तातडीने सभात्याग ( होटेल त्याग ) केला. तेव्हा त्या भागात आतासारखी भरपूर होटेल्स नव्हती. कुणी म्हणाले कात्रज घाट सुरु होतो तिथे एक ढ़ाबा  आहे तिथे जावुया।  मग काय निघालो. धाब्याची बातमी खोटी निघाली. आता माघार घेणे शक्य नव्हते. पुढचे ठिकाण ठरले खेड़ शिवापुर येथील हॉटेल  ग्रांड।  तेव्हा तिथे पण आतासारखी विपुल होटेल्स नव्हती. 
आम्ही ६ जण होतो. २ हेमंत ( बेरी आणि मोरगांवकर), विश्वास सहस्रबुद्धे, तुषार कोर्लेकर , बाबा राणे आणि अस्मादिक। आमच्यात बाबा सोडला तर सगळे विवाहित होते आणि त्यामुळे गप्पांचा ओघ बाबाच्या लग्न न झाल्यामुळे तो कसा सुखी आहे यावर होता. घाट चढ़त चढ़त कात्रज बोगद्याशी आलो।  तिथे थांबून जरा पुणे शहराकडे पाहिले. सर्वत्र स्वच्छ चांदण पसरल हॉट. आकाशात पूर्ण चंद्रबिंब विलस त होत। वातावरण एकदम अद्भुत होत। आणि बाबा एकदम म्हणाला मला एक घोषणा करायची आहे की माझ लग्न ठरले आहे व् ही बातमी सांगायला या सारखी दूसरी चांगली वेळ आणि जागा असूच शकत नाही. मैग गप्पांचा मूड एकदम बदलला आणि जेवून घरी आलो तेव्हा अडीच वाजुन गेले होते अणि फोन नसल्याने व् अचानक ठरल्याने घरी काही कल्पना न दिल्याने आमची शोधाशोध सुरु झाली होती. 
पौर्णिमेचा पूर्ण चंद्र सगळे वातावरण धुंद व भारलेले होते. याचे छान वर्णन कुसुमाग्रजांनी त्यांच्या हे शशांका स्वप्नांच्या सौदागरा या लघु निबंधात केलेले आहे. पण पौर्णिमेच्या पूर्ण चंद्र बिंबाची मजा तो अचानक समोर येण्यात आहे. असाच एक पौर्णिमेचा चंद्र अनपेक्षित ठिकाणी व् अनपेक्षित पार्श्व भूमीवर पहायला मिळाला। चंडीगढ़ हून मनाली येथे चाललो होतो. कुलू मागे पडले तेव्हा मध्यरात्र उलटून गेली होती। अरुंद रस्त्यावरून बस धावत होती. बाजूने बियास नदीचे खळाळत वाहणारे पात्र. बसची एका बाजूची चाके नदीतून चालली असावीत असा भास होत होता. डोळयांवर  झोप होती पण वातावरणातील गूढ़ता पैन जाणवत होती. आमचे हॉटेल नदीच्या दुसऱ्या तीरावर असल्याने आम्ही नदीवरील पूल पार करत होतो. तो पार करत असताना डावीकडे पाहिले तर पूर्ण विकसित झालेले चन्द्रबिंब आणि त्याचा प्रकाश पसरला होता एका बर्फाच्छादित शिखरावर. केवळ अप्रतिम आणि मनोहारी दृश्य होते ते. सहलीच्या कार्यक्रमात या दृश्याचा समावेश नव्हता. 
चंद्राचा  थोड़ा नाट्यानुभव मालविकाग्निमित्रम च्या रागमालिकेच्या प्रवेशात व् नुकतेच जे मृच्चकटिक नाटक पाहिले त्यातील रजनी नाथ हा या गण्याच्या वेळीस मिलला होता. अन्यथा नागरी  जीवनात असे अनुभव दुर्मिळच। 

अनिल जोशी 
०८. ०४. २०२० 
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नवासह द्यावी. 



Comments

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती