स्वर यात्रा p

Tanpura Stock Photos & Tanpura Stock Images - Alamy

परवा कोणत्याशा चित्रपटाबाबत बोलण चालू होत. त्यावर एक प्रतिक्रिया अशी आली की त्यातील गाणी किती मस्त आहेत. म्हणजे एखाद्या चित्रपटाचे मूल्य मापन त्यातील गाण्यांवर होते. वास्तविक चित्रपट हे मध्यम कॅमेर्याचे, दिग्दर्शकाचे, क्लोज अप, लॉंग शॉट, थरार दृश्ये, रमणीय निसर्ग, यांचा प्रभाव असलेले. प्रसंगाला उठाव आणण्यासाठी थोडे पार्श्व संगीत. बस्स. पण भारतीय चित्रपट याला अपवाद आहे. त्यात गाणी असणे अपरिहार्य आहे. त्यामुळे भारतीय संगीताचा , त्यातल्या त्यात सुगम संगीताचा इतिहास लिहायचा झाला तर चित्रपट संगीताला वगळून नाही लिहिता येणार. चित्रपटातील काही प्रसंग गहिरे करण्यासाठी तिथे गाण्याची योजना केली जाते. किंवा काही सूचित करायचे असेल तरी गाणे केले जाते. म्हणजे सकाळ झाली हे सुचवायला देवघरातील भजन, किंवा नायक नायिका प्रेमात पडले दाखवायला प्रणय गीत, कधी विरह गीत, कधी लहान मुलाला झोपवायला अंगाई गीत, कधी कोठीवरचा मुजरा, एक ना अनेक असे अनेक प्रसंग व त्यावरची अनेक गाणी हे सगळे आठवणे म्हणजे स्वर यात्रा.

गायक किंवा संगीतकार  यांच्या जीवनावर जे चित्रपट आले त्यातील गाणी विशेष गाजली. आणि लगेच आठवतो तो बैजू बावरा. यात एकूण १३ गाणी आहेत.
Baiju bawra songs pk download
* तू गंगा की मौजमे - मोहमद रफी
*आज गावत मन मेरो -अमीर खान
*ओ दुनिया के रखवाले -मोहमद रफी
*दूर कोई गाये  -लता मंगेशकर, शमशाद बेगम
*मोहे भूल गये सावरिया- लता मंगेशकर
*झुले मी पवनकी आई बहार- लता मंगेशकर व मोहमद रफी
*मन तरपत हरी दरसन को आज -मोहमद रफी
* बचपन की मोहबत को- लता मंगेशकर
*इन्सान बनो -मोहमद रफी
*तोरी जयजयकार कर्तार -अमीर खान
*लंगर कांकरिया जी ना मारो - अमीर खान व डी व्ही पलुस्कर
*घनन घनन घन गर्जो -अमीर खान
*सरगम -अमीर खान

मीना कुमारी व भरत भूषण यांच्या भूमिका असलेल्या चित्रपटाचे संगीत होते नौशाद यांचे. यातील बरीच गाणी रागदारीवर आधारित असून अमीर खान साहेब व डी व्ही पलुस्कर यांच्यासारख्या मातब्बरांनी यात गावून हा चित्रपट सांगीतिक दृष्ट्या उच्च पातळीवर नेला.

या नंतर आठवतो तो म्हणजे गुंज उठी शहनाई. संगीतकार वसंत देसाई यांनी बिस्मिल्ला खान साहेब यांच्या शहनाईचा सुरेख वापर करून एक अप्रतिम चित्रपट (सांगीतिक) दिलाच त्याच बरोबर बिस्मिल्ला खान साहेब व त्यांची शहनाई घरोघर पोचली.
Goonj Uthi Shehnai, 1959 135/365 Bollywood Centenary Celebrations ...

यात एकूण १० गाणी आहेत.
* दिलका खिलौना भै टूट गया -लता मंगेशकर
*तेरी शहनाई बोले -लता मंगेशकर
*अन्खीया भूल गायी -लता मंगेशकर
*कह दो कोई ना करे यहा प्यार _मोहमद रफी
*तेरे सूर और मेरे गीत -लता मंगेशकर 
* मैने पिना सिख लिया -मोहमद रफी 
*जीवन मी पिया तेरा प्यार रहे 
*हौले हौले घुंघट 
राजेंद्र कुमार व अमिता यांच्या भूमिका असलेल्या चित्रपटाला वसंत देसाई यांचे संगीत लाभले. तर गीत रचना भरत व्यास यांच्या होत्या.
असाच एक संगीत पट मास्टर भगवान व गीता बाली यांचा अलबेला. १९५१ मध्ये आलेल्या चित्रपटात तब्बल २० गाणी आहेत. सी. रामचंद्र यांचे विविधता पूर्ण संगीत व त्याला मास्टर भगवान यांच्या निरागस अभिनयाची साथ या मुळे हा चित्रपट गाजला. मी साधारण पणे १९७७ मध्ये पहिला आणि नीलायम चित्रपट गृहात लोकांनी गाण्यांना दाद म्हणून पैसे फेकलेले पहिले आहेत. 
b>Bukal</b> Vich - Geeta Zaildar - Punjabi Songs Online Listen and ...

*देवता माना और पूजा -लता मंगेशकर
*ए मेरे दिल -किशोर कुमार
*मै हु अलबेला ०किशोर कुमार 
*जान भी दे दु -बप्पी लाहिरी (२)
* बडी मुश्कीलसे -अशा भोसले
* मामाजी मामाजी -किशोर कुमार 
* म्युझिक इज माय लाईफ-आशा भोसले 
*बलमा बडा नादान रे -लता मंगेशकर 
*किस्मत की हवा कभी नरम -सी रामचंद्र 
*हसीनोंसे मुह्बत का बुरा -सी रामचंद्र 
*तेरी याद ने मारा -लता मंगेशकर
*मेहफिल मी मेरी कौन -मोहमद रफी 
*धीरे से आजा रे अखियन मी निंदिया -लता मंगेशकर
* शाम ढले खिडकी तले -लता मंगेशकर 
*शोला जो भडके -सी रामचंद्र व कोरस 
*दिल धडके नजर शर्माये-लता मंगेशकर
*भोली सुरत दिलके खोटे- सी रामचंद्र, लता मंगेशकर 
*दिवाना परवाना -लता मंगेशकर 
*दिवाना आ गया -मोहमद रफी .

ही अखंड चालणारी स्वर यात्रा. अशाच काही गाण्याच्या आठवणी परत कधीतरी. 

अनिल जोशी 
२०.०४.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी. 

Comments

  1. मला आठवला चोरी चोरी. रोमन हॉलिडे वर बेतलेला!
    रमेश दातार.

    ReplyDelete
  2. I enjoy Bollywood movies with good songs. Even the more recent ones I watch if the songs touch me! Nicely written. I must watch these oldies!
    Swati Karve

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती