सदासुहागन सदारंजनी भैरवि
रंगलेल्या मैफलीत भैरवीचे सूर छेडले जातात आणि मैफलीच्या समाप्तीची चाहूल लागते. त्यात मैफल संपल्याची हूर हूर असते पण तृप्तीची भावना पण तितकीच असते. तुडुंब जेवण झाले तरी स्वीट डिश ची लज्जत काही न्यारीच असते. अति मधुर सूर सगळ्या मैफलीवर एक छान सुरेल आवरण घालतात आणि मैफल परिपूर्ण होते. भैरवी ही चटका लावून जाणारी असते आणि अनेक मान्यवर कलाकारांनी आपली छाप एकेका भैराविवर टाकली आहे.
भैरवी ही मैफलीच्या शेवटी गायिली जाते पण कट्यार काळजात घुसली या नाटकात सुरुवातीलाच भैरवी आहे. याचे कारण असे दिले गेले की नाटकाची जरी सुरुवात असली तरी भानुप्रसाद पंडित या गायकाच्या कारकीर्दीचा तो शेवट होता . भैरवी म्हणजे भजन, ठुमरी, चीज, अशी गायिली जाते. खयाल सहसा नाही. पण एका सवाई गंधर्व संगीत समारोहात रविवार सकाळच्या सत्रात शेवटचे कलाकार अजय चक्रवर्ती यांनी भैरवीत खयाल सादर केला होता तो ऐकायचा सुयोग आला होता.
सैगल पासून भीमसेन, किशोरी यांची बाबुल मोरा कशी विसरता येईल ? विनायक बुवा पटवर्धन , ओमकारनाथ ठाकूर , मल्लिकार्जुन मन्सूर अशा बुजुर्ग कलाकारांनी जोगी मत जा ही अमर केलेली भैरवी. भवानी दयानी ही परवीन सुलताना यांची भैरवी, निरंजनी नारायणी ही पंडित जसराज यांची भैरवी.तर भीमसेन यांची सरळ सोप्या चालीची जो भजे हरी को सदा ही भैरवी. पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी सर्वात्मका सर्वेश्वरा व कैवल्याच्या चांदण्याला या रचना इतक्या फेमस केल्या की एका कार्यक्रमात शौनक म्हणाले होते की या दोन रचना म्हणजे राष्ट्रगीते झाली आहेत. ती गायल्या शिवाय मैफल संपन्न होत नाही.
शास्त्रानुसार भैरवीत सर्व कोमल सूर आहेत पण कोमल सुरांबरोबर शुद्ध सुरांनाही आणण्याचे स्वातंत्र्य कलाकार घेतात. भैरवीत धृपद, धमार, होरी टप्पा, ठुमरी तराणा, भजन असे सर्व प्रकार भैरवीत गायले जातात. बर्याच वेळा वेळे अभावी भैरवी सुरु झाली की ते सूर मनात घोळवत रसिक सभागृहाबाहेर पडतात.
१९८० मध्ये जेव्हा संगीत मालविकाग्निमित्रम हे नाटक केले जे म्हणजे एक संगीत मैफल होते व शेवटचा प्रवेश हा रागमालिकेचा होता व शेवटी भैरवी. अतिशय सुरेल भैरवी समूहस्वरात कलाकार सादर करायचे व पडदा पडायचा पण सुमारे ४ तास सुरु असलेले नाटक व अवघडून बसलेले प्रेक्षक भैरवी सुरु होताच उठून उभे राहायचे . थोडा भैरवी वर अन्याय होत असे पण प्रयोगाला दाद वसूल.
आज भैरवी राग ब्लॉग साठी घ्यायचे कारण म्हणजे आजचा हा १५० वा ब्लॉग. आज सुमारे ५ महिन्यांच्या सततच्या लिखाणानंतर रोजचा ब्लॉग थांबवायचा निर्णय घेत आहे. ब्लॉग सुरु करतांना तो आरम्भशूर पणा ठरू नये या साठी सतत रोज लिखाणाचा संकल्प सोडला होता. यात आपले लेखन कौशल्य पणाला लागते व लिखाणात एक सफाईदार पण येते. आणि मनात साचलेले अनेक विषय त्यामुळे हाताळता आले. दिसामाजी काही तरी लिहित जावे पण ते वाचले गेले तर जास्त चांगले , त्या मुळे जेव्हा हा ब्लॉग चा पर्याय उपलब्ध झाला तेव्हा मी तो वापरला. या लेखनातून अनेकांना स्मरण रंजनाचा अनुभव आला.मला आलेले काही अनन्यसाधारण अनुभव शब्दबद्ध करता आले. काही लेखांची निर्मिती ही विलक्षण आनंद देणारी होती.
अजून अनेक राग त्याच्यावर लिहावे म्हणून खुणावत आहेत, विरार, अमळनेर, या सारखी आठवणीतील गावे त्यांच्यावर कधी लिहिणार म्हणून प्रश्न करत आहेत. अनेक व्यक्तींच्या आठवणी शब्दबद्ध करायच्या आहेत.
पण गेले ५ महिने या खात्यातून जावक जास्त झाली आहे आणि आवक जवळ जवळ थांबल्या सारखी. त्या साठी थोडे मनन, वाचन ,चिंतन व्हायला हवे आहे. त्या साठी हे रोजचे ब्लॉग अतिशय जड मनाने थांबवण्याचा निर्णय घेतला. आता रोजच्या ऐवजी अधून मधून ब्लॉग लिहिण्याचा मानस आहे. शिवाय एकाच प्रकारच्या लेखनात अडकून पडले की अन्य निर्मिती कडे लक्ष दिले जात नाही . म्हणजे हे रोजचे ब्लॉग थांबल्यावर काही भरीव निर्मिती होईलच असे नाही पण त्याकडे पाहायला मात्र हवे असे वाटले.
अशी ही गण्यामधली भैरवी जिने मैफिलीची सांगता होत असली तरी गाण्यांमधली भैरवी कधी संपत नाही. आबाचा ढोल च्या दैनिक मालिकेची ही भैरवी असली तरी या ब्लॉग मधून लेखनाची मैफल सुरूच राहील . फक्त रोज नाही इतकच.
अनिल जोशी
२३.०५.२०२०
आपली प्रतिक्रिया कृपया नावासह द्यावी.
भैरवी नंतर भूपाळी घ्या..
ReplyDeleteआम्हाला रोज वाचनाची सवय लावली आहेत..
तेव्हा रंगत आली असताना..खरं सांगायचं तर आत्ता आवाज तापलेला असताना मैफल आटोपती न घेता...
भूपाळी ने पुन्हा सुरू करा...
रोजच्या लेखांच्या प्रतिक्षेत..
धनश्री जोशी पुणे
फारच छान वाटलं... भैरवीवर अतिशय अभ्यासपूर्ण आणि रोचक लेख तुम्ही लिहिला आहे... या लेखासाठी आणि संपूर्ण लेखमालिकेसाठी मनःपूर्वक धन्यवाद...
ReplyDelete.... प्रशांत थोरात,पुणे कार्यवाह, गुरुकृपा संस्था.
Very well written as always....Heartiest Congratulations for reaching 150 posts....and All the best for many more to come.....though not daily....It has been a great consistency worth appreciation....covering gamut of topics from politics, music, travelogues, memoirs to human relationships.....a great succor in the challenging times around us....Awaiting for the future posts.....
ReplyDeleteMasta anildada! Keep writing!
ReplyDeleteMasta kaka! Asech lihit Raha. You write so many styles and it is true that if you write just one you can find the bandwidth for other styles!
ReplyDeleteKeep writing once a week at least! These days in the age of social media reading has taken a back seat. People read blogs on the go, they may not comment
Another idea is write a blog on one topic so end of the year you'll have a collection. Your idea of blogs on raags or specific themes of places or simply your experiences of meetings with different people by themselves will make collections enough to publish!! You have so much to share, keep it coming!!!
Swati
प्रमोद वामन वर्तकचा नमस्कार !
ReplyDelete150व्या ब्लॉग बद्दल अभिनंदन !
रोज एखाद्या विषयावर लिहिणे वा त्यासाठी विषय सुचणे, हे येरागबाळ्याचे काम नाही, आपल्यासारखेच हे करू जाणोत !
आपले लिखाण फारच वाचनीय असते आणि ते तसेच पुढे वाचायला मिळावे एव्हढीच इच्छा !
आपला लिखाणाचा मानस या पुढेही आपल्या मनाप्रमाणे पूर्ण होवो, हीच सदिच्छा !
अनिल, सातत्याने 150 ब्लाॅग लिहीणे सोपं काम मुळीच नव्हतं. तुझ्या उत्साह आणि चिकाटीचे खूप कौतूक. पुनश्च हरी ॐ साठी मनापासून शुभेच्छा.
ReplyDeleteChalu rahu de na Pl.
ReplyDelete