डोळे हे जुलमी गडे
आपल्या नाक, कान, त्वचा
,जीभ या इंद्रियां प्रमाणेच डोळे हे पण एक इंद्रिय आहे पण डोळ्यांवर सारे कवी आणि
गीतकार डोळ्यांवर जास्त मेहेरबान आहेत.
कधी लाडिक तक्रार करताना
प्रेयसी म्हणते –डोळे हे जुलमी गडे, रोखुनी मज पाहू नका.
कधी नजरेचा पाठलाग होतो- या
डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भवती, पाठलाग ही सदैव करतील असा कुठे ही जगती.
कधी प्रियकर प्रेयसीला
म्हणतो- डोळ्यात वाच माझ्या गीत भावनांचे.
डोळे हे पारदर्शी असतात
म्हणून प्रियकर सांगतो – डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी , त्या दूरच्या दिशांना
सांगू नकोस कहाणी.
तर कुणी म्हणत –मोठ मोठ डोळ
तुझ कोळ्याच जाळ जणू , मोत्याची मासळी त्यात गावायची नाय.
हीच गोष्ट हिंदी मध्ये पण
आढळते.
नैन लाड गायी रे तो मनवा
........
नैनसे नैन नाही मिलाओ
मेरे नयना सावन भादो, फिरभी
मेरा मन प्यासा
जानेमन जानेमन तेरे दो नयन,
चोरी चोरी लेके गये देखो मेरा मन
मेरे दो नयन चोर नाही सजन ,
तुमसे ही खोया होगा कही तुम्हारा मन
आंखो ही आखो मे इशारा हो
गया बैठे बैठे जीनेका सहारा हो गया.
आंखो की गुस्ताखीया माफ हो
आखोमे बसे हो तुम
नयनोंकी बात नयना जाने
नयनो मी सपना
नयनोंकी बात जो नयना जाने
नैनोके तीर चला के घायल कर
गायी रे
अशी एक ना अनेक गाणी डोळे
या विषयावर लिहिली गेली आहेत व मनात घर करून आहेत. डोळे हे मनाचा आरसा मानले जातात
त्यामुळे ते भावना उघड करतात, लपवत नाहीत. त्यामुळे जे शब्द बोलतात ते डोळ्यातून
व्यक्त झाले तरच त्याला खरे मानले जाते.
डोळे दिसतात पण डोळ्यांची
शक्ती नजर मात्र दिसत नाही. ती जाणवते. ती नजर या डोळ्यांतील भाव त्या
डोळ्यांपर्यंत पोचवते. डोळ्यांचे शृंगारात अनन्यसाधारण महत्व आहे. डोळ्यांचा
शृंगार म्हणजे काजळ हे पक्के समीकरण आहे. डोळ्यांतून वेगवेगळे भाव व्यक्त होतात.
प्रेयसी जेव्हा प्रियकराकडे विशिष्ट भावनेने पहाते आणि आणि प्रियकर जेव्हा विद्ध
होतो तेव्हा त्याला प्रेयसीचे डोळे म्हणजे बाण वाटतात. त्यांना नयन बाण म्हणतात.
कवी म्हणून जातो-
नयन तुझे जादुगार , साधा ही
नयन बाण विन्झीतसे काळजास
मग त्याला का उगाच कालकूट
माखतेस
असे हे जादुई डोळे सर्वांना
भुरळ घालतात . पण हेच जर तुम्ही एखाद्या नेत्र तज्ञ डॉक्टर ला विचारल तर तो रेटीना
वगैरे बोलेल. त्याला डोळ्यात मोतीबिंदू किंवा काच बिंदू दिसतील.
या डोळ्यांचा दुसरा
व्यावसायिक अवतार म्हणजे चष्मे. क्षीण झालेल्या डोळ्यांना मदत करणारे हे उपकरण
जोरात व्यवसाय करते.
म्हणून मला वाटते डोळे हे
माणसाला मिळालेले अनन्यसाधारण वरदान आहे.
अनिल जोशी
03.05.2020
कृपया आपली प्रतिक्रिया नावासह द्यावी
Comments
Post a Comment