आमचा विजुमामा - जवळचं असामान्य व्यक्तिमत्व
एखादी व्यक्ती आपल्या जवळची असते तेव्हा तिचं वेगळेपण , असामान्यत्व हे पटकन लक्षात येत नाही. त्यंच्या जाण्यानंतर जेव्हा त्या व्यक्तीच्या आठवणी सतत येतात तेव्हा मात्र आपण त्या व्यक्ती बद्दल अधिक विचार करू लागतो. विजुमामाच तसच काहीसं आहे. विजुमामा म्हणजे आईचा लहान भाऊ. तिच्यापेक्षा 8 वर्षांनी लहान. आणि तो ४ वर्षांचा असताना त्याची आई गेल्यामुळे त्याची आमच्या आईची जास्त भावनिक जवळीक होती. त्याचप्रमाणे त्याचा मोठा भाऊ ज्याला आम्ही अण्णा मामा म्हणायचो त्याचा पण आई आणि विजुमामा यांना खूप आधार होता. तसा तो पण फार मोठा नव्हता पण परिस्थितीशी झगडून या तिघांनी आपली नाती सांभाळली व एका मोठे कुटुंब सांभाळले.
विजुमामा आमच्या आईला माई म्हणत असे आणि त्याचे आमच्याकडे जाणे येणे असे. १९५६ ते १९६३ व १९६६ ते १९६९ आमचे वास्तव्य मुंबईच्या आसपास होते त्या मुळे जाणे येणे वरचेवर होत असे. जेव्हा आम्ही नागपूर येथे होतो त्या वेळी मात्र त्यांचे येणे झाले नव्हते . अर्थात त्यावेळी कौटुंबिक अडचणी होत्या. आजोबांचे अखेरचे आजारपण, त्यांचे निधन वगैरे.
मेट्रीक परीक्षेत विजुमामाने मोठे यश मिळवून आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवली. नंतर नोकरी सांभाळून त्याने पदवी घेतली व नंतर कायद्याची पदवी पण घेतली. त्याची सुरुवातीचा अपवाद वगळता सगळी नोकरी रिझर्व बँकेत झाली. त्यात त्याने अनेक जबाबदार्या निभावल्या .त्या बरोबरच त्याने बँकेच्या युनियन ची पण काही वर्षे जबाबदारी घेतली होती. या सगळ्या काळात त्याने संघ कार्य पण केले. अखेर मुंबईतील एका जिल्ह्याचा तो बौद्धिक विभाग प्रमुख पण होता. साहित्य, संगीत , नाट्य यांची त्याला जाण होती. हे छंद पण त्याने डोळसपणे जोपासले. आम्ही लहान असताना तो जेव्हा येत असे तेव्हा नवीन नाटके, गाण्याचे कार्यक्रम याबाबत भरभरून बोलत असे आणि त्यावेळी ते फारसे समजत नसले तरी ऐकावेसे वाटत असे. अभ्यासात एखाद्या निबंधाबाबत तो वेगळाच विचार सांगत असे. त्या जाणत्या अजाणत्या वयात त्यामुळे त्याच्या बद्दल माझ्या मनात जे सुप्त आकर्षण निर्माण होत गेले व तो माझा एक आदर्श (idol ) बनत गेला.
१९६९ मध्ये त्याचे लग्न झाले व त्याला सुयोग्य जोडीदार वीणा मामी मिळाली . त्यानंतर एक कलाटणी देणारी घटना घडली. १९६९ मध्ये वडिलांची चेंबूर येथून विसापूर येथे बदली झाली. आणि या दोघांनी -मामा व मामी - यांनी असा आग्रह धरला की मी त्यांच्या बरोबर विसापुरला जावू नये. कारण मी १०वित होतो आणि ती दोन वर्षे अभ्यासाच्या व पुढील कारकीर्दीच्या दृष्टीने महत्वाची असल्याने त्या खेडे गावात जावू नये. त्या वेळी मी दादरच्या किंग जॉर्ज ( आताच्या राजा शिवाजी) हाय स्कूल मध्ये होतो. विजुमामाने तेव्हा डोंबिवली येथे संसार सुरु केला होता. मग आम्ही निर्णय घेतला व मी डोंबिवलीच्या टिळक नगर विद्यामंदिरात प्रवेश घेतला. ही दोन वर्षे या दोघांचा निकटचा सहवास लाभला. इतकेच नव्हे तर अभ्यासाला एक पद्धत, शिस्त, मिळाली व शिक्षणाची गाडी मार्गी लागली. याच काळात संघ शाखेत नियमित गेल्याने व एक महिना संघ शिक्षा वर्गाला गेल्याने किती फायदा झाला हे शब्दात सांगता येणार नाही . थोडक्यात नंतर पुण्यात जे काही शिक्षण, विध्यार्थी परिषद, साहित्य चर्चा मंडळ या माध्यमातून जे काही करू शकलो त्याचा पाया डोंबिवली येथील वास्तव्यात घातला गेला. त्याने सहज जाता जाता शास्त्रीय संगीत कसे ऐकावे या बाबत अनेक टिप्स दिल्या व अभिजात मनोरंजनाचे एक मोठे दालन उघडून दिले. अनेक राजकीय घटनांचे तो छान विश्लेषण करत असे त्या मुळे प्रत्येक घटनेकडे वेगळ्या अंगाने पहायचा दृष्टीकोन दिला.
त्याचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे तो फक दिशा दाखवायचा , म्हणजे त्याचे म्हणणे पटलेच पाहिजे असा आग्रह नसायचा. तो निर्णय आमच्यावर सोडायचा.
योगेश व प्रज्ञा या दोघांना त्यांनी योग्य पणे वाढवले . आणि आपला प्रपंच नेटका करतना आप्तेष्टांना पण मदत केली. एवढे हे करताना त्याला प्रकृतीची तितकीशी साथ नाही मिळाली. किडनी स्टोन चा आजार, त्यावर शस्त्रक्रिया ,मग किडनी निकामी होणे, डायलेसिस हे सगळ बाळगत त्याने जग प्रवास केला . त्याने आपल्या प्रकृतीची कारणे सांगून जबाबदारी टाळली नाही.फक ६४ वर्षांच्या आयुष्यात त्याने आमच्यासमोर एक आदर्श ठेवला असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही.
आज त्याचा वाढदिवस असायचा त्या मुळे अनेक आठवणी मनात आल्या त्यांना शब्दात मांडायचा हा छोटा प्रयत्न.
अनिल जोशी
०२.०६.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया नावासह द्यावी

हृद्य आठवणी !
ReplyDeleteछान आठवण. यात ज्या किंग जार्ज हायस्कुलचा उल्लेख आलाय तेथेच माझी व अनिलची ओळख झाली.काही वर्षे आम्ही एका वर्गात होतो.नंजर तो डोंबिवली व पुणे येथे गेला.पण आमची मैत्री आजतागायत घट्ट आहे.
ReplyDeleteएकदम सही..मनातलं मनापासून.
ReplyDelete